महाज्योती मोफत टॅब योजनेत नवीन बदल; Tab कधी मिळणार? सूचना पत्र जारी

Published On: November 29, 2025
Follow Us
MahaJyoti Tab Notice

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत राबविण्यात येणाऱ्या JEE/NEET/MHT-CET-2025-27 परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेतील निवड यादी नुकतीच जाहीर झाली असून, राज्यातील 3500 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

आता नवीन सूचनेनुसार या विद्यार्थ्यांसाठी टॅबसोबत सिमकार्ड वितरीत करण्याऐवजी सिमकार्डचा खर्च थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

सिमकार्ड खर्चासाठी दरमहा 500 रुपये मिळणार

JEE/NEET/MHT-CET-2025-27 या प्रशिक्षण योजनेअंतर्गत पूर्वी विद्यार्थ्यांना प्रतिदिन 6GB इंटरनेट डेटासह पोस्टपेड सिमकार्ड पुरवले जात होते.

मात्र, २०२५-२६ वर्षापासून सिमकार्डच्या लाभात सुधारणा करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आता स्वतःचे सिमकार्ड खरेदी करायचे असून , त्यासाठी त्यांना प्रतिमाह ₹५००/- याप्रमाणे त्रैमासिक (तीन महिन्यांनी) पद्धतीने रक्कम त्यांच्या बँक खात्यात प्रदान केली जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘आधार सिडिंग’ आवश्यक

सिमकार्ड खर्चासाठी दरमहा 500 या रकमेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी काही सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.

  • विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत (Nationalised bank) खाते असणे अनिवार्य आहे.
  • विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक बँक खाते क्रमांकाशी संलग्न (Aadhar seeding) केलेला असावा.
  • आधार सिडिंग नसल्यास, रक्कम जमा करता येणार नाही, अशी स्पष्ट सूचना महाज्योतीने दिली आहे.

MahaJyoti Tab कधी मिळणार?

प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना MahaJyoti Tab वितरणाबद्दल महाज्योती कार्यालय आणि Career Point Edutech Ltd., यांच्यामार्फत टॅब वाटपाच्या दोन दिवसांपूर्वी कॉलद्वारे कळविण्यात येईल.

आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर, विद्यार्थ्यांच्या संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत MahaJyoti Tab चे वितरण केले जाईल. असे सूचना पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

प्रशिक्षणाशी संबंधित कोणत्याही अडचणींसाठी विद्यार्थी Career Point Edutech Ltd., यांच्या मोबाईल क्रमांक ८००७७७४४७५ किंवा महाज्योतीच्या ०७१२-२८७०१२०/२१ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

हा निर्णय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि MahaJyoti Tab सह दिल्या जाणाऱ्या संसाधनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी घेण्यात आला असल्याचे महाज्योतीने स्पष्ट केले आहे.

अभिनंदन! महाज्योती मोफत टॅब साठी 3500 विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर

अधिक माहितीसाठी : सूचना पत्र येथे डाउनलोड करा

अधिकृत वेबसाईट : https://mahajyoti.org.in/

MahaJyoti Tab Notice

महाज्योती योजना

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment