Ladki Bahin Yojana Latest Update: ‘माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारने केला मोठा खुलासा! 2.52 कोटी महिलांना मिळणार आर्थिक मदत!

By Marathi Alert

Updated on:

Ladki Bahin Yojana Latest Update: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात महत्त्वाचे स्पष्टीकरण देताना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, या योजनेच्या पहिल्या शासन निर्णयात समाविष्ट असलेल्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. संपूर्ण प्रक्रिया आणि कार्यवाही या मूळ निकषांनुसारच सुरू आहे.

राज्य विधिमंडळात सदस्य अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना त्या बोलत होत्या. चर्चेत सतेज (बंटी) पाटील, अशोक (भाई) जगताप, शशिकांत शिंदे आणि चित्रा वाघ यांनीही सहभाग घेतला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्रता व अर्ज प्रक्रिया

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, योजनेच्या अटी व शर्तींनुसार लाभार्थी महिलांची पात्रता व अपात्रता ठरवली जाते. अर्जांची तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे, त्यामुळे ज्या महिला पात्रता निकष पूर्ण करत नाहीत त्यांना योजनेचा आर्थिक लाभ दिला जात नाही. (या महिला अपात्र निकष पाहा)

लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, 2.63 लाख लाभार्थी अपात्र? पात्रता यादी पहा

2.52 कोटी महिलांना मिळणार आर्थिक मदत Ladki Bahin Yojana Latest Update

Ladki Bahin या योजनेंतर्गत 2.63 कोटी महिलांनी अर्ज नोंदणी केली असून, त्यापैकी 2.52 कोटी महिला पात्र ठरल्या आहेत. ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लागू आहे, त्यामुळे 65 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांचा लाभ दर महिन्याला आपोआप बंद होतो.

लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट

लाडकी बहिण योजनेतून महिला बाद !

लाडकी बहीण ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लागू आहे, त्यामुळे 65 वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो. यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते. सध्या सुमारे 1.20 लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद झाल्या आहेत.

त्याचप्रमाणे, विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांचाही योजनेंतर्गत विचार केला जात नाही. राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून, महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. यामुळे महिलांकडून सरकारचे अभिनंदन केले जात आहे.

लाडकी बहीण योजना: ‘रूपे कार्ड’ लाँच आणि ₹3000 जमा होण्याची नवीन तारीख जाहीर!

65 वर्षे पूर्ण झालेल्या 1.20 लाख महिला योजनेतून बाद
विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांना लाभ नाही
अडीच कोटी महिलांना या योजनेचा फायदा

लाडक्या बहिणींसाठी सरकारची मोठी भेट! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ‘रूपे कार्ड’ लाँच

2100 रुपयांच्या सन्मान निधीबाबत खुलासा Ladki Bahin Yojana 2100 Kadhi Yenar

राज्य सरकार २१०० रुपयांपर्यंत सन्मान निधी वाढवणार असल्याच्या चर्चांबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. राज्य सरकारकडून २१०० रुपयांपर्यंत सन्मान निधी वाढवण्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, असेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले. याबाबतचा अंतिम निर्णय आगामी अर्थसंकल्पात घेतला जाईल.

लाडकी बहीण योजनेतून ‘या’ महिला अपात्र!

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत काही महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. महिला आणि बालविकास विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, खालील निकषांनुसार लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहे.

🔹 इतर सरकारी योजनेतून दरमहा ₹1500 किंवा अधिक आर्थिक मदत मिळत असल्यास – संजय गांधी निराधार योजनेच्या 2.30 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले.

🔹 कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी किंवा स्वेच्छेने अर्ज मागे घेतलेल्या महिलांना1.60 लाख महिला अपात्र ठरल्या.

🔹 वय 65 वर्षांपेक्षा जास्त असल्यास – योजनेच्या नियमांनुसार, 1.10 लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आला.

लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, 2.63 लाख लाभार्थी अपात्र? पात्रता यादी पहा

याशिवाय, या महिला देखील अपात्र!

आंतरराज्य विवाह केलेल्या महिला
आधार कार्ड आणि बँक खात्यातील नाव भिन्न असल्यास
एकाच महिलेने दोन अर्ज केल्यास

महत्वाची सूचना: लाभ मिळवण्यासाठी पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. अपात्र महिलांना योजना बंद करण्यात येत असून, नवीन अर्जांची छाननी सुरू आहे.

Ladki Bahin Yojana Latest Update: या योजनेमुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असून, सरकारच्या या उपक्रमाचे भरभरून स्वागत होत आहे.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

Leave a Comment

error: Content is protected !!