Lek Ladki Yojana Update महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने ‘लेक लाडकी’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता १६.०८ कोटी रुपयांचा (सोळा कोटी आठ लाख रुपये) निधी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Lek Ladki Yojana Update संपूर्ण माहिती
Lek Ladki या योजनेचा उद्देश मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, मुला-मुलींमधील भेदभाव कमी करणे, मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि बालविवाह रोखणे आहे.
योजनेचे महत्त्वाचे टप्पे आणि आर्थिक मदत
‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत पात्र मुलींना जन्मापासून १८ वर्षांपर्यंत एकूण १ लाख १ हजार रुपये टप्प्याटप्प्याने दिले जातात:
- जन्मानंतर ₹६,०००
- पहिलीत प्रवेश घेतल्यावर ₹४,०००
- सहावीत प्रवेश घेतल्यावर ₹६,०००
- अकरावीत प्रवेश घेतल्यावर ₹८,०००
- १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ₹७५,०००
योजनेसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
- पात्रता:
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ₹१ लाखापेक्षा कमी असावे.
- एका कुटुंबातील दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. तिसरी मुलगी असेल आणि दोन्ही मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केले असेल, तर तिलाही लाभ मिळू शकतो.
- आवश्यक कागदपत्रे:
- मुलीचा जन्म दाखला, आधार कार्ड.
- पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुक, रहिवासी आणि उत्पन्नाचा दाखला.
- शाळेत प्रवेश घेतल्याचा दाखला.
लेक लाडकी योजनेचा शासन निर्णय व अर्ज नमुना Lek Ladki Yojana Form
लेक लाडकी योजनेसाठी अर्जाचा नमुना व सविस्तर तपशील अधिकृत शासन निर्णयात पहा – डाउनलोड करा
निधी वितरण तपशील
‘लेक लाडकी’ योजनेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षातील जाहिरातींसाठीची प्रलंबित देयके तसेच २०२५-२६ मधील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे. शासन निर्णय वाचा