Local Holiday Circuler महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्ट्यांमध्ये बदल जाहीर केला आहे. या संदर्भात, 7 ऑगस्ट 2025 रोजी एक शुद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.
पूर्वी जाहीर केलेल्या गोपाळकाला (दहीहंडी) आणि अनंत चतुर्दशीच्या सुट्ट्या आता रद्द करण्यात आल्या आहेत. त्याऐवजी, आता नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जन निमित्त स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
सुट्ट्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- नारळी पौर्णिमा: शुक्रवार, 08 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी असेल.
- ज्येष्ठगौरी विसर्जन: मंगळवार, 02 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी असेल.
या सुट्ट्या फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमधील राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना लागू असतील. हे आदेश महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या नावाने काढण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी : शासन शुद्धीपत्रक वाचा
