MAH BA BSc BEd CET 2025 Application Deadline Extended बी.ए./बी.एस्सी.-बी.एड (चार वर्षांचा एकत्रित कोर्स) करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत या कोर्ससाठीची CET 2025 परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया (CAP) आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षी (२०२५-२६) शेवटचा वर्ष असेल, ज्यामध्ये हा कोर्स पूर्वीप्रमाणे चालणार आहे. पुढील वर्षापासून (२०२६-२७) हा कोर्स बंद करून ITEP (Integrated Teacher Education Programme) कोर्स लागू केला जाणार आहे.
MAH BA BSc BEd CET 2025 Application Deadline Extended
परीक्षा तारीख: सीईटी परीक्षा दिनांक: रविवार, २० जुलै २०२५
अर्ज भरण्याच्या तारखा:
- सुरुवातीची तारीख: ०२ जून २०२५
- मूळ अंतिम तारीख: १५ जून २०२५
- वाढवलेली अंतिम तारीख: आता २३ जून २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
का वाढवण्यात आली तारीख?
मुदतवाढीचे कारण आणि उमेदवारांची सद्यस्थिती: पूर्वीच्या सूचनेनुसार, सुमारे 1308 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी, 395 उमेदवारांनी यशस्वीरित्या नोंदणी करून शुल्क भरले आहे. मात्र, 913 उमेदवारांनी अद्याप अर्ज पूर्ण केलेला नाही किंवा नोंदणी शुल्क भरलेले नाही. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून सीईटी सेलने हा निर्णय घेतला आहे.
इतर महत्वपूर्ण माहिती:
- नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (NCTE) ने ०६ मे २०२५ रोजी जाहीर केलेल्या सूचनेनुसार, चार वर्षांचा बी.ए./बी.एस्सी-बी.एड. अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून बंद केला जाईल आणि त्याऐवजी चार वर्षांचा इंटिग्रेटेड टीचर ट्रेनिंग कोर्स (ITEP) सुरू केला जाईल.
- शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी चार वर्षांच्या बी.ए./बी.एस्सी-बी.एड. अभ्यासक्रमासाठी सीईटी (CET) आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे मुंबई येथे घेतली जाईल.
- सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या अभ्यासक्रमासाठी कॅप (CAP) आयोजित केली जाईल. या संदर्भात स्वतंत्र वेळापत्रक वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल.
- २३ जून २०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मदतीसाठी संपर्क: अर्ज भरण्यासंबंधी कोणतीही शंका असल्यास, उमेदवार cethelpdesk@maharashtracet.org या ई-मेल आयडीवर मेल करू शकतात किंवा ‘कँडिडेट हेल्प मॉड्यूल’द्वारे आपला प्रश्न मांडू शकतात.
ही माहिती आयुक्त आणि सक्षम प्राधिकारी, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने जारी करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : https://cetcell.mahacet.org/
