MAH Integrated CET Notice 2025 राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी BBA/BCA/BBM/BMS MBA (Integrated) MCA (Integrated) CET 2025 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा करण्याची संधी दिली आहे. उमेदवारांना त्यांच्या अर्जातील काही विशिष्ट माहितीमध्ये बदल करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
MAH Integrated CET Notice 2025
MAH Integrated CET Notice 2025 शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित करण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षांच्या संदर्भात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या या सीईटीसाठी ज्या उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांना ही संधी मिळेल.
अनेक उमेदवारांनी अर्ज भरताना नकळतपणे चुका केल्या असल्याचे समोर आले आहे. या चुका दुरुस्त करण्याबाबत उमेदवारांकडून लॉग-इन, दूरध्वनी, ईमेल आणि प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊन विनंत्या प्राप्त झाल्या होत्या. या विनंत्यांचा विचार करून आणि उमेदवारांच्या शैक्षणिक हितासाठी, त्यांना खालील माहितीमध्ये बदल करण्याची संधी देण्यात आली आहे:
- उमेदवाराचे नाव
- जन्मतारीख
- छायाचित्र
- सही
- लिंग
या माहितीमध्ये बदल करण्याचा कालावधी
०१ जुलै २०२५ ते ०३ जुलै २०२५ पर्यंत असेल. उमेदवारांनी या कालावधीत स्वतःच्या लॉग-इनमधून अर्जामध्ये सुधारणा करावी, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आयुक्त तथा सक्षम प्राधिकरी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी, उमेदवार https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा cetcell@mahacet.org या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात.
