MAH MBA MMS CET Result Notice महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) MAH-MBA/MMS-CET 2025 परीक्षेतील आक्षेपांवर अंतिम अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, एकूण 101 प्रश्नांवर नोंदवलेल्या 253 आक्षेपांपैकी काही प्रश्नांमध्ये बदल करण्यात आले असून, काही सत्रांतील विद्यार्थ्यांना वाढीव गुण (1 mark) मिळणार आहेत, तर काही प्रश्नांची उत्तरतालिका (Answer Key) अद्ययावत करण्यात आली आहे.
MAH MBA MMS CET Result Notice
आक्षेप आणि त्यांची स्थिती:
CET सेलने 24 एप्रिल 2025 रोजी आक्षेप नोंदवण्यासाठी एक नोटीस जारी केली होती आणि 1 ते 3 एप्रिल 2025 दरम्यान महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये एकूण 6 सत्रांमध्ये घेण्यात आलेल्या MAH-MBA/MMS-CET 2025 परीक्षेसाठी आक्षेप ट्रॅकर उपलब्ध करून दिला होता.
या परीक्षेतील विविध विभागांमधून एकूण 253 आक्षेप नोंदवले गेले होते, ज्यात 101 युनिक प्रश्न आयडी (Unique Question ID) होते.
- अॅबस्ट्रॅक्ट रिझनिंग (Abstract Reasoning): 21 आक्षेप, 8 युनिक प्रश्न आयडी
- लॉजिकल रिझनिंग (Logical Reasoning): 134 आक्षेप, 44 युनिक प्रश्न आयडी
- क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड (Quantitative Aptitude): 35 आक्षेप, 14 युनिक प्रश्न आयडी
- व्हर्बल ॲबिलिटी (Verbal Ability): 63 आक्षेप, 35 युनिक प्रश्न आयडी
एकूण 253 आक्षेप आणि 101 युनिक प्रश्न आयडी नोंदवले गेले.
महत्त्वाचे बदल आणि गुणदान:
MAH MBA MMS CET Result Notice अंतिम अहवालानुसार, अनेक प्रश्नांमध्ये “कोणतेही बदल नाहीत” (No Changes) असे नमूद केले आहे. तथापि, काही विशिष्ट प्रश्न आयडीसाठी विद्यार्थ्यांना गुणदान किंवा उत्तरतालिकेत बदल करण्यात आले आहेत.
उदाहरणार्थ:
- 1 एप्रिल 2025, मॉर्निंग शिफ्ट, लॉजिकल रिझनिंग, प्रश्न आयडी 202578: या प्रश्नासाठी या सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना 1 गुण दिला जाईल.
- 1 एप्रिल 2025, मॉर्निंग शिफ्ट, व्हर्बल ॲबिलिटी, प्रश्न आयडी 202728: या प्रश्नासाठी या सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना 1 गुण दिला जाईल.
- 1 एप्रिल 2025, इव्हिनिंग शिफ्ट, अॅबस्ट्रॅक्ट रिझनिंग, प्रश्न आयडी 202819: या प्रश्नाची उत्तरतालिका अद्ययावत करण्यात आली आहे.
- 2 एप्रिल 2025, मॉर्निंग शिफ्ट, लॉजिकल रिझनिंग, प्रश्न आयडी 202968, 202969, 202946, 203001, 203002, 203009, 202948: या सर्व प्रश्नांसाठी या सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 गुण दिला जाईल.
- 3 एप्रिल 2025, इव्हिनिंग शिफ्ट, व्हर्बल ॲबिलिटी, प्रश्न आयडी 203801, 203802, 203803, 203804, 203805: या सर्व प्रश्नांसाठी या सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 गुण दिला जाईल.
अधिक माहितीसाठी: अंतिम अहवाल येथे डाउनलोड करा
परीक्षकांनी अंतिम अहवालामध्ये नमूद केलेल्या बदलांची नोंद घ्यावी. अधिक तपशील आणि पूर्ण अहवाल CET सेलच्या अधिकृत वेबसाइट https://cetcell.mahacet.org/ वर उपलब्ध आहे.
