महाराष्ट्र CET सेलने SEBC आणि OBC उमेदवारांना दिलासा दिला आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी परिपत्रक, शासन निर्णय येथे पहा
हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच CET सेलच्या www.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर देखील हे परिपत्रक पाहता येईल. विद्यार्थ्यांनी अधिकृत सूचनांसाठी या संकेतस्थळांना नियमित भेट द्यावी.



