Mahila Din Gramsabha In Maharashtra: महिला दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित केली जाणार आहे. बालविवाह, अंधश्रद्धा आणि अन्यायकारक प्रथांवर जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे? कोणत्या योजनांचा फायदा मिळणार? सविस्तर वाचा
Table of Contents
राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा Mahila Din Gramsabha In Maharashtra
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिला दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या ग्रामसभेचा मुख्य उद्देश महिलांच्या हक्कांसाठी व्यापक लोकचळवळ उभी करणे, महिलांचे जीवनमान उंचावणे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवणे हा आहे.
महिला दिनाचं गिफ्ट! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत दुप्पट निधी
या ग्रामसभेत कोण सहभाग घेणार?
या विशेष ग्रामसभेमध्ये स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि नागरिकांनी महिलांच्या उन्नतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले आहे.
अंगणवाडी सेविका, मदतनिसांसाठी खुशखबर! मोठी पगारवाढ आणि १८,००० जागांसाठी नवीन भरती!
या विशेष ग्रामसभेचे मुख्य उद्दिष्ट
✅ महिला हक्क आणि सक्षमीकरणासाठी लोकचळवळ उभी करणे
✅ गावपातळीवर महिलांसाठी प्रभावी धोरणे अंमलात आणणे
✅ महिला सुरक्षा व न्यायासाठी ठोस उपाययोजना राबवणे
✅ बालविवाह, जाचक विधवा प्रथा, अन्यायकारक अंधश्रद्धा यांचे उच्चाटन
✅ मुलींच्या जन्मदर वाढीसाठी व्यापक जनजागृती
लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट! पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ३००० रुपये जमा!
या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून बालविवाह, जाचक विधवा प्रथा, अन्यायकारक अंधश्रद्धा यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तसेच मुलींच्या जन्मदर वाढीसाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे.
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार
लाडकी बहीण योजनेत वाढीव रक्कम जाहीर होणार का? महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे!
ऐतिहासिक प्रेरणा आणि सरकारचे प्रयत्न
महाराष्ट्राने राजमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून महिला हक्कांसाठी लढा देण्याची परंपरा जपली आहे. आजच्या काळातही महिलांसाठी न्याय आणि सुरक्षा देणे तसेच प्रत्येक गाव आणि खेड्यापर्यंत महिला व बालकांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शासन आजही महिला व बालविकासासाठी प्रभावी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कटीबद्ध आहे. (Mahila Din Gramsabha In Maharashtra)