MHT CET Atal Registration : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी आणि क्षमता ओळखण्यासाठी तसेच आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्याधुनिक ‘अटल’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात सहभागी कसे व्हावे? याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूया.
Table of Contents
अटल उपक्रमाचा मुख्य उद्देश
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET CELL) विद्यार्थ्यांसाठी “अटल” नावाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षमतांची ओळख करून देणे आणि आत्मविश्वास वाढवणे हा आहे.
अटल उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
- मॉक टेस्ट आणि सायकोमेट्रिक टेस्ट: या चाचण्यांद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि आवडीनिवडी समजण्यास मदत होते.
- आत्मविश्वास वाढवणे: सराव परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेची भीती कमी होते.
- करिअर मार्गदर्शन: विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्ग निवडण्यासाठी मदत मिळते.
- व्यापक सहभाग: कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन यांसारख्या विविध शाखांमधील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
- दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी: या उपक्रमामुळे राज्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी सराव करण्याची संधी मिळते.
- एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग: आत्तापर्यंत १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय आहे.
- शैक्षणिक संधी: या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व त्यांच्या क्षमतांनुसार योग्य शैक्षणिक आणि व्यावसायिक विषयांची निवड करण्यास मदत होईल.
MHT CET 2025 Exam Date: प्रवेश परीक्षा तारखा जाहीर, वेळापत्रक आणि Admit Card Release Date
मुख्य मुद्दे
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित केले आहे.
- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
- राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी समान संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
CET Cell Schedule 2025-26 : राज्य सामायिक प्रवेश परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
CET – ATAL बद्दल
CET – ATAL उपक्रम हा महाराष्ट्र राज्याचे माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्य CET सेलचे माननीय आयुक्त श्री. दिलीप सरदेसाई (IAS) यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला आहे.
CET – ATAL (मूल्यांकन, चाचण्या आणि शिक्षण) हा महाराष्ट्र राज्य CET सेलचा उपक्रम आहे, जो महाराष्ट्रातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना मदत करेल. या मॉक टेस्ट आणि मानसशास्त्रीय चाचण्या उमेदवारांना त्यांचे स्वप्नातील शैक्षणिक क्षेत्र शोधण्यास आणि मुख्य प्रवेश परीक्षांसाठी यशस्वी तयारी करण्यास मदत करतील.
CET – ATAL नोंदणी करण्याचे आवाहन
“या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक संधी शोधता येतील आणि आत्मविश्वास वाढीस लागेल. परीक्षेच्या तयारीचा ताण कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावा.”
नोंदणी कशी करावी? MHT CET Atal Registration
Step 1 : Visit – https://mocktest.mahacet.org/ New Registration: Click on the New Registration button to register

Step 2 : Registration Details:
Personal Details: Enter your Full Name, Gender, Date of Birth, Category, Stream, Nationality

Enter Your Address, Mobile Number, Email Address
Enter your password as per the instructions and confirm the same. Then enter Captcha as shown in the below image. If Captcha is not visible or difficult then, please click on the reset button to change
the Captcha Image.

Step 3 : After filling in all the above information, kindly read the Terms and Conditions and Disclaimer. Then, check both checkboxes and click the “Save & Proceed” button.
Step 4 : Mobile Number Verification:
OTP will be sent on Mobile number, which is entered by you in previous step.
Check the SMS box the and enter the OTP and click on ‘Verify OTP’ to Confirm entered mobile number.

Step 5 : Email Verification:
OTP will be sent on Email ID, which is entered by you in the previous step.
Check the Inbox enter the OTP and click on ‘Verify Email OTP’ to Confirm the entered Email ID.

Step 6 : ID Generation:
After mobile number and Email verification, the Email ID will be displayed on the screen

Keep your Email ID for future reference and click on the “Proceed to Complete Application Form” button to log in.
Step 7 : Registered Candidate Sign In:
Enter your Email ID Choose Password and click on the Sign In button.

If the candidate is unable to log in, click on “Forgot Password” to reset the Password.
Step 8 : Candidate Dashboard
After successful Login Candidate can see the two types of Tests
- Psychometric Test
- Mock Tests for different courses
‘अटल’ उपक्रम अंतर्गत राज्य सामाईक प्रवेश कक्षाने (CET Cell) विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्ट आणि सायकोमेट्रिक टेस्ट उपलब्ध करून दिल्या आहेत.
परीक्षा प्रक्रिया
- डॅशबोर्ड: विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या आणि सक्रिय असलेल्या परीक्षांची यादी पाहता येईल.
- परिक्षा सुरू करणे: “Start Test” बटणावर क्लिक करून परीक्षा सुरू करता येईल.
- उत्तर मार्क करणे: पुढे पाहण्यासाठी प्रश्न “Mark for Review” मध्ये ठेवता येईल.
- परीक्षा पूर्ण झाल्यावर: परीक्षा आपोआप सबमिट होईल.
निकाल आणि विश्लेषण
- परीक्षेनंतर अभ्यासक्रमानुसार विश्लेषण, सरासरी टक्केवारी आणि चॅप्टर वाईज प्रगती अहवाल पाहता येईल.
- चुकीच्या उत्तरांसाठी योग्य उत्तर आणि स्पष्टीकरण दिले जाईल.
मदत केंद्र
- अडचण असल्यास Help Desk विभागात जाऊन तिकीट उघडता येईल.
- तांत्रिक सहाय्यसाठी +91-7969134411 (सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) संपर्क साधता येईल.
नोंदणीसाठी अधिक माहितीसाठी
अधिकृत वेबसाईट : mocktest.mahacet.org
MHT CET CELL Official Website : https://cetcell.mahacet.org/
📢 विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा आणि परीक्षांसाठी अधिक आत्मविश्वासाने तयारी करावी!