MSRLM Fund GR महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (MSRLM) कार्यरत असलेल्या समुदाय संसाधन व्यक्ती (Community Resource Person-CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी यांना वाढीव मानधन देण्यासाठी आणि स्वयंसहाय्यता गटांना अतिरिक्त फिरता निधी वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन २०२५-२६ करिता ४३,९८,७६,५००/- रुपये (सुमारे ४३.९८ कोटी रुपये) इतका निधी मंजूर केला आहे. ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार १४ जुलै, २०२५ रोजी या निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.
MSRLM Fund GR
मानधन आणि निधी वाढीची पार्श्वभूमी:
१६ सप्टेंबर, २०२३ रोजी संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी यांना त्यांच्या कामाचे मूल्यांकन करून कमाल रु. ६०००/- प्रति महिना मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्याचबरोबर, अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता गटांना त्यांच्या सध्याच्या “अ”, “ब” आणि “क” श्रेणीकरणानुसार कमाल १५,०००/- रुपये फिरता निधी (Revolving Fund) वितरित करण्यात येत होता.
या निर्णयानंतर, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, स्वयंसहाय्यता गटांची वर्गवारी करून “अ” वर्गवारी प्राप्त होणाऱ्या गटांना रु. ३०,०००/- आणि वर्गवारी “ब” व “क” मध्ये येणाऱ्या गटांना प्रचलित पद्धतीनुसार फिरता निधी देण्याबाबत शासन निर्णय (संदर्भ क्र. १) निर्गमित करण्यात आला होता.
महत्वाच्या सूचना:
मंजूर करण्यात आलेले हे अनुदान केवळ ज्या उद्देशासाठी (समुदाय संसाधन व्यक्तींचे वाढीव मानधन आणि स्वयंसहाय्यता गटांना फिरता निधी) मंजूर केले आहे, त्याच उद्देशासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. अन्यथा, ही वित्तीय अनियमितता मानली जाईल, याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय वाचा
.


