Nhm Contractual Staff Regularization Decision : नवीन वर्ष राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (NHM) हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या लढ्यासाठी संघर्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आता लवकरच निर्णय होणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण (Nhm Contractual Staff Regularization) बाबतचा अंतिम निर्णय 10 ते 15 जानेवारी दरम्यान होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेतला जाणार आहे.
शासन सेवेत समायोजनाबाबत 10 ते 15 जानेवारी दरम्यान होणार निर्णायक बैठक!
१० ते १५ जानेवारी ठरणार निर्णायक: हिवाळी अधिवेशनात सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी राज्य शासनाने एक कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने हा प्रश्न सोडवण्यात येत असून, याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक १० ते १५ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत समायोजनाचे निकष आणि प्रक्रिया यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
१० वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्यांना मिळणार न्याय
शासनाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, १४ मार्च २०२४ पर्यंत ज्या कर्मचाऱ्यांची १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झाली आहे, त्यांना सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभागातील रिक्त पदांवर सामावून घेतले जाणार आहे.
हे समायोजन सेवा प्रवेश नियमात बदल न करता ‘एक वेळची विशेष बाब’ म्हणून करण्यात येईल. विशेष म्हणजे, या Nhm Contractual Staff Regularization प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीएवढी वयाची अट शिथिल करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे.
वेतन निश्चितीबाबत मोठा दिलासा
समायोजन झाल्यानंतर पगार कमी होणार का? अशी भीती कर्मचाऱ्यांना होती. मात्र, २६ डिसेंबर २०२५ च्या शासन आदेशान्वये हा संभ्रम दूर करण्यात आला आहे.
वाहन चालक व इतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना, त्यांना लगतच्या मागील महिन्यात मिळणाऱ्या मानधनाएवढ्या रकमेच्या नियमित वेतनश्रेणीतील पुढील टप्प्यावर त्यांचे वेतन निश्चित केले जाईल. यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान टळणार असून त्यांना वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.
आंतरविभागीय समिती ठरवणार निकष
या समायोजन प्रक्रियेत पारदर्शकता रहावी यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आंतरविभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती नियमित पदांवरील समायोजनासाठी निकष निश्चित करेल.
आरोग्य विभागातील तांत्रिक अडचणी आणि वेतनातील विलंब दूर करून कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी सेवा प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळणाऱ्या या निर्णयामुळे आरोग्य विभागाचा कणा असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात स्थैर्य येणार आहे. त्यामुळे आता १० ते १५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मूळ शासन निर्णय (GR) डाऊनलोड करा
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन; सुधारित शासन निर्णय निर्गमित












