NHM Document Verification Nashik राष्ट्रीय आरोग्य अभियान दुसरी फेरीची यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य सोसायटी, नाशिक पदभरतीसाठी प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने गुणवत्ता यादीतील व सामाजिक आरक्षणानुसार १:३ प्रमाणात खालील यादीत नमुद उमेदवारांना मुळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशन प्रक्रिया द्वितीय फेरीकरीता बोलविण्यात आले आहे.
NHM Document Verification Nashik
मुळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशनाने निवड प्रक्रिया द्वितीय फेरी दि.०८/०४/२०२५
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दै. आपले महानगर वृत्तपत्रातील प्रसिध्द् जाहीरात क्र.७/२०२४, दि.०४/१०/२०२४ नुसार खालील पदाकरीता प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने गुणवत्ता यादीतील व सामाजिक आरक्षणानुसार १:३ प्रमाणात खालील यादीत नमुद उमेदवारांना मुळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशन प्रक्रिया द्वितीय फेरीकरीता खालीलप्रमाणे बोलविण्यात आले आहे.
एकूण पात्र उमेदवार
- महिला – 77 उमेदवार
- पुरुष – 15 उमेदवार
- स्थळ :- श्री. रावसाहेब थोरात सभागृह (जुने), जिल्हा परिषद, नाशिक
- दिनांक :- ०८/०४/२०२५
- वेळ :- स. १०.०० वा. (मुळ कागदपत्रे पडताळणी) व स. ०२.०० वा. (समुपदेशन)
- Name of Post – Staff Nurse
सदर प्रक्रियेत उमेदवारांचे मुळ कागदपत्रे पडताळणी करुन पात्र उमेदवारांचे गुणवत्ता यादीप्रमाणे समुपदेशन घेण्यात येईल.
नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी भरती!
उमेदवारांसाठी सुचना
१) उमेदवारांनी मुळ कागदपत्रांच्या पडताळणीकरीता सदर पदाकरीताचे सर्व आवश्यक कागदपत्रेसमुपदेशनाच्या अगोदर सादर करावेत. उदा. शैक्षणिक अर्हता सर्व वर्षाचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, वयाचा दाखला/१० वी ची सनद, MSCIT प्रमाणपत्र, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. प्रमाणपत्र, जात/वैधता प्रमाणपत्र, अनुभवाचे प्रमाणपत्र इ. उमेदवार सदरील मुळकागदपत्रे सादर करण्यास असमर्थ असल्यास त्याची निवड होणार नाही.
पुढील सुचना विषयीची अधिक माहिती https://zpnashik.maharashtra.gov.in/, www.nrhm.maharashtra.gov.in & https://arogya.maharastra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
दुसऱ्या फेरीतील यादी
दुसऱ्या फेरीतील यादी: उमेदवारांची गुणवत्ता यादी, समुपदेशन वेळापत्रक, आणि कागदपत्र तपासणीची यादी येथे पाहा
