Navi Mumbai Recruitment: नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) गट-क आणि गट-ड मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी www.nmmc.gov.in recruitment 2025 अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Table of Contents
Navi Mumbai Recruitment पदांचा तपशील
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) ने गट-क आणि गट-ड पदांच्या विविध विभागांमध्ये एकूण ६२० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकूण पदांची संख्या: ६२०
पदांचे नाव खालीलप्रमाणे
- बायोमेडिकल इंजिनियर
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
- कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)
- उद्यान अधीक्षक
- सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी
- वैद्यकीय समाजसेवक
- डेंटल हायजिनिस्ट
- स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (G.N.M.)
- डायलिसिस तंत्रज्ञ
- सांख्यिकी सहाय्यक
- ई.सी.जी. तंत्रज्ञ
- सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ
- आहार तंत्रज्ञ
- नेत्र चिकित्सा सहाय्यक
- औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी
- आरोग्य सहाय्यक (महिला)
- बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक
- पशुधन पर्यवेक्षक
- ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M.)
- बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)
- शस्त्रक्रियागृह सहाय्यक
- सहाय्यक ग्रंथपाल
- वायरमन
- ध्वनीचालक
- उद्यान सहाय्यक
- लिपिक-टंकलेखक
- लेखा लिपिक
- शवविच्छेदन मदतनीस
- कक्षसेविका/आया
- कक्षसेवक (वॉर्डबॉय)


या भरती प्रक्रियेमध्ये विविध संवर्गातील पदांचा समावेश आहे, ज्यात प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य आणि निमवैद्यकीय सेवा क्षेत्रातील पदे आहेत.
महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: २८ मार्च २०२५
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ११ मे २०२५ (रात्री ११.५५ पर्यंत)
- ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत: ११ मे २०२५
- परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख: परीक्षेच्या ७ दिवस आधी
- ऑनलाईन परीक्षेची तारीख: प्रवेशपत्रामध्ये नमूद केली जाईल
शैक्षणिक पात्रता
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अन्य आवश्यक गोष्टी PDF जाहिरातीत सविस्तरपणे दिल्या आहेत. उदा. बायोमेडिकल इंजिनियर पदासाठी बायोमेडिकल इंजिनियरिंगमधील पदवी आणि २ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज, जाहिरात महत्वाच्या लिंक
अर्ज कसा करावा: इच्छुक उमेदवारांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी PDF जाहिरात पाहा
- ऑनलाईन अर्ज: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/Index.html
- अधिकृत वेबसाईट: https://nmmc.gov.in/navimumbai/
उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्जासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.