NHM Amravati Recruitment 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, अमरावती जिल्हयात विविध कार्यक्रमाअंतर्गत पदांची पदभरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत असुन, खालील तक्त्यानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
Table of Contents
NHM Amravati Recruitment 2025
पदांचा तपशील
- स्टाफ नर्स – 124
- वैद्यकीय अधिकारी (पुरुष) – 07
- वैद्यकीय अधिकारी (महिला) – 05
- लॅब टेक्निशियन – 10
- फार्मासिस्ट – 07
- प्रोग्रॅम असिस्टंट (सांख्यिकी) – 01
- जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – 01
- फिजिओथेरपिस्ट – 01
- न्यूट्रिशनिस्ट – 01
- समुपदेशक – 08
महत्वाच्या तारखा
इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मुळ प्रती व छायांकित केलेल्या साक्षांकित प्रतीसह उपरोक्त नमुद केलेल्या मंजूर पदांसाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि. १९/०३/२०२५ पासुन ते दि. ०३/०४/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन ते ५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) स्विकारण्यात येतील, तसेच दि. ०३/०४/२०२५ नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा व ई-मेलद्वारे प्राप्त अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची स्वतःच्या E-mail ID वरुन अर्जाची हार्ड कॉपी Download करून संबंधीत शैक्षणिक कागदपत्र व धनाकर्ष (Demand Draft) सोबत जोडून विहीत कालावधीत अर्ज सादर करावा.
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण:- रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यु आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजुला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अम:रावती.
मूळ जाहिरात
वरील पदांकरीता मुलाखत दिनांक तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, आवेदन शुल्क ई. बाबत सविस्तर जाहीरात व माहिती zpamravati.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
टिप – भरती बाबतचे वेळापत्रक तसेच दिनांक/निवड/प्रतिक्षा यादी ई. बाबतची सर्व माहिती व जाहिरात अटी व शर्तीसह zpamravati.gov.in वर उपलब्ध आहे.
महत्वाच्या लिंक
- ऑनलाईन गुगल फॉर्म अर्ज: इच्छूक उमेदवारांनी सोबत दिलेल्या QR Code वरुन ऑनलाईन गुगल फॉर्म भरावयाचा आहे.
- मूळ जाहिरात PDF डायरेक्ट लिंक
- अधिकृत वेबसाईट: https://zpamravati.gov.in/en/notice-category/recruitments/
- 2024 वर्षातील पदभरती निवड यादी जाहीर येथे पाहा यादी
