Medical Officer Bharti 2025: सार्वजनिक आरोग्य विभागात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या उद्देशाने 450 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आधीच करण्यात आली आहे. त्यानंतर, आणखी 1,500 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी 10 एप्रिल रोजी जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी विधानपरिषदेत दिली.
Table of Contents
ग्रामीण आरोग्यासाठी सक्तीची सेवा
मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले की, वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरांसाठी ग्रामीण भागात एक वर्ष सेवा देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच, औषध पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणि दर्जा कायम ठेवण्यासाठी औषधांची एनएबीएल प्रमाणित प्रयोगशाळांमध्ये तपासणी अनिवार्य करण्यात येईल.
रुग्णवाहिका आणि ट्रॉमा केअर सेंटर वाढणार
राज्यात आणखी 1,800 नवीन रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. अपघातप्रवण भागांमध्ये ट्रॉमा केअर सेंटर्स (Trauma Care Centers) वाढविण्याच्या योजनांवरही विचार सुरू आहे.
सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी ठोस पावले
मंत्री आबिटकर यांनी असेही स्पष्ट केले की, राज्यात वैद्यकीय उपकरणे आणि औषधांच्या खरेदीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे, जे भ्रष्टाचार रोखण्यास मदत करेल. तसेच, सरकारी रुग्णालयांतील कॅंटीन सुधारण्यासाठी लवकरच धोरण आणले जाणार आहे.
Medical Officer Bharti 2025 वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी मोठी संधी
राज्यात वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी 10 एप्रिलला होणारी जाहिरात महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी भरती प्रक्रियेसाठी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या : https://phd.maharashtra.gov.in/mr/