राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर, आक्षेप हरकती या तारखेपर्यंत नोंदविता येणार NHM Revised Eligible and Ineligible List Announced

By MarathiAlert Team

Published on:

NHM Revised Eligible and Ineligible List Announced : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदभरती (NHM Recruitment 2025) प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची सुधारित पात्र व अपात्र यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सुधारित पात्र व अपात्र यादी जाहीर

परंतु जिल्हास्तरावर प्राप्त तक्रारीच्या अनुषगांने सदर पात्र व अपात्र याद्या रद्द करण्यात येत असुन अर्जाची फेरतपासणी करणेत येऊन अर्ज नमुद पदासांठीची (वैद्यकीय अधिकारी आरबीएसके स्त्री व पुरुष, वैद्यकीय अधिकारी आयुष, वैद्यकीय अधिकारी निओनेटल, ममुपेदशक, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, प्रोग्राम मॅनेजर, बायोमेडिकल इंजिनिअर, ऑडीओलोजीस्ट, आहारतज्ञ व क्ष-किरण तंत्रज्ञ) सुधारित पात्र व अपात्र यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. कृपया उमेदवारांनी यांची नोंद घ्यावी.

उर्वरित पदांची यादी (स्टाफ नर्स, दंत शल्यचिकित्कस व ओषध निर्माण अधिकारी) पुढील कालावधीत प्रसध्दि करण्यात येईल.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!

आरोग्य विभागात २,००० पदनिर्मिती करण्यास राज्य सरकारची मंजूरी, शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू

आक्षेप हरकती या तारखेपर्यंत नोंदविता येणार

ज्या उमेदवारांना हरकती. आक्षेप अथवा सूचना असतील त्यांनी लेखी स्वरुपात दिनांक १७/02/2025 ते 21/02/2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे नोदवाव्यात.

  • सदर कालावधीत फक्त लिखित स्वरुपात हरकती BY Hand किंवा nhmnbrestablishment@gmail.com या आयडी वर नोंदवाव्यात.
  • दिनांक 21/02/2025 मायं 6 वाजेनंतर आलेल्या उमेदवारांच्या कोणत्याही हरकतीची, आक्षेप अधवा सूचनांची दखल घेण्यात येणार नाही यांची नोंद घ्यावी.

अंगणवाडी भरतीची जाहिरात येथे पाहा

उमेदवारांनी काय करावे?

  1. स्वतःचे नाव पात्र उमेदवारांच्या यादीत आहे का, हे तपासा.
  2. जर काही दुरुस्ती करायची असेल किंवा अपात्र उमेदवार असाल आणि पुनरावलोकन हवे असेल, तर सुधारित अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे दिलेल्या अंतिम मुदतीत जमा करा.
  3. अर्ज ई-मेल किंवा संबंधित जिल्हा आरोग्य विभाग कार्यालयात प्रत्यक्षरित्या सादर करा.

पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करा NHM Revised Eligible and Ineligible List Announced

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदभरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्र आणि अपात्र यादी खाली दिलेल्या अधिकृत लिंकवर पाहा

पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी येथे पाहा

अधिक माहितीसाठी : www.arogya.maharashtra.gov.inwww.zpndbr.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

जिल्हा आरोग्य एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, नंदुरबार मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कंत्राटी पदाकरिता दि 10/09/2024 पर्यंत अर्ज सादर करणेबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.

सदर जाहिरातीनुसार प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र व अपात्र उमेदवारांची यादी www.zpndbr.inwww.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर यापुर्वी प्रसिध्द करण्यात आली होती.

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!