NHM Salary Latest Update: राज्यातील Contarctual (कंत्राटी) आणि Permanent Employees (कायम) कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी आहे! आता कर्मचाऱ्यांच्या पगाराला उशीर झाल्यास, त्याची जबाबदारी थेट विभागीय उपसंचालकांवर निश्चित करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत हे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे वेतन प्रस्ताव या तारखेपर्यंत सादर करावा लागणार

कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होणं किती महत्त्वाचं आहे, हे त्यांनी अधोरेखित केलं. कुणालाही पगारासाठी वाट पाहावी लागू नये, हा त्यांचा स्पष्ट आग्रह आहे. त्यामुळे, जर यापुढे कर्मचाऱ्यांचा Salary (पगार) उशिरा झाला, तर संबंधित परिमंडळातील उपसंचालकांना जाब द्यावा लागेल, असं त्यांनी बजावलं आहे.
NHM Contract Workers (राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी) आणि Asha Workers (आशा स्वयंसेविका) यांच्यासाठीही तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्वांचे मानधन त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करा, असे आदेश आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथील बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी दिले. राज्यभरातील उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक या बैठकीला उपस्थित होते.
ऑक्टोबर महिन्यात शासनाने नियमित आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देण्याबाबत एक परिपत्रक जारी केले होते. विशेषतः Diwali Festival (दिवाळी सणा) च्या पार्श्वभूमीवर सर्व कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा, यासाठी आरोग्यमंत्र्यांनी हे कठोर पाऊल उचलले आहे.
यापुढे Salary Proposal (वेतन प्रस्ताव) दर महिन्याच्या १५ तारखेला शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. सोबतच, Funding (निधी) संबंधित पुरवणी मागण्या वेळेत आणि बिनचूक सादर व्हाव्यात, यासाठी Training (प्रशिक्षण) सुरू करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.एका अर्थाने, Accountability (जबाबदारी) निश्चित करणारा हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे. आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आता कर्मचाऱ्यांचे हक्काचे पगार वेळेवर मिळतील, अशी अपेक्षा आहे.



