पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटीने राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) अंतर्गत विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती जाहीर केली आहे.
ही भरती एकूण ७५ पदांसाठी असून, यात वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून ते स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांपर्यंत विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची आहेत आणि प्रकल्प पूर्ण झाल्यावर आपोआप संपुष्टात येतील. उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. या भरतीसंबंधीची सर्व माहिती, जसे की प्राथमिक गुणवत्ता यादी, हरकती आणि अंतिम गुणवत्ता यादी, वेळोवेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट www.pcmcindia.gov.in वर प्रसिद्ध केली जाईल.
उमेदवारांना याबाबत कोणतीही वैयक्तिक सूचना दिली जाणार नाही, त्यामुळे वेबसाइट नियमित तपासणे आवश्यक आहे.


