PM Modi 3.0 नवीन सरकारचा पहिला मोठा निर्णय! PM kisan Beneficiary Status News

By Marathi Alert

Updated on:

PM kisan Beneficiary Status News: नरेंद्र मोदी यांनी आज (दि 10) रोजी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारताच PM किसान योजनेसंदर्भात पहिला मोठा निर्णय घेतला आहे.

PM Modi 3.0 नवीन सरकारचा पहिला निर्णय

PM kisan Beneficiary Status News

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकरी हितासाठी नवीन सरकारने पहिला महत्वाचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान निधीच्या पहिल्या फाईलवर स्वाक्षरी केली, आमचे सरकार किसान कल्याणसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली ही पहिली फाईल आहे.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 10 जून रोजी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला, त्यानंतर त्यांनी नवीन सरकारचा पहिला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेतला आहे.

PM kisan Beneficiary Status News: नवीन सरकारच्या पहिल्याच दिवशीचा पहिला निर्णय शेतकरी हितासाठी, किसान सन्मान निधीचा 17 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, या फाईलवर पहिली सही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

या निर्णयामुळे देशभरातील 9 हजार 300 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जमा होणार आहे.

चेक करा – PM किसान लाभार्थी यादीत तुमचे नाव पाहा 

मोठी बातमी : केंद्र सरकारचा कॅबिनेटमध्ये दुसरा धडाकेबाज निर्णय

असा चेक करा तुमचा हप्ता

पीएम शेतकरी सन्मान योजनेचा (PM Kisan Yojana) 16 वा हप्ता यापूर्वी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आला होता, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खात्याशी आधार लिंक करून घेणे आवश्यक आहे. तसेच बँकेत KYC पूर्ण करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना https://pmkisan.gov.in वर जाऊन आपल्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा 17 वा हप्ता जमा झाला की नाही? हे पाहू शकता. तसेच यासंदर्भात काही अडचण असल्यास हेल्पलाइन (PM-Kisan Helpline No. 155261 / 011-24300606) वर संपर्क करु शकता.

नवीन सरकारची संपूर्ण मंत्रिमंडळ यादी पाहा

Leave a Comment