Poshan Tracker THR Guidlines: नमस्कार अंगणवाडी सेविका ताईंनो, सध्या पोषण ट्रॅकर ॲपवर काम करताना तुम्हाला तांत्रिक अडचणी येत आहेत का? विशेषतः THR (Take Home Ration) वाटप करताना अनेकदा माहिती सबमिट होत नाही किंवा एरर येतो. ही पोस्ट वाचून तुमची ही समस्या कायमची सुटणार आहे, कारण विभागाने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
पोषण ट्रॅकरवर THR भरताना ‘या’ चुका टाळा; नवीन मार्गदर्शक सूचना जारी
पोषण ट्रॅकरवर काम करताना अनेकदा आपल्याकडून नकळत काही चुका होतात, ज्यामुळे आपली मेहनत वाया जाते. THR वाटप सुरळीत होण्यासाठी खालील नवीन (Poshan Tracker THR Guidline) काळजीपूर्वक समजून घ्या.
१. फक्त Daily Tracking मधूनच माहिती भरा: अनेकदा आपण वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करतो, पण आता स्पष्ट सूचना देण्यात आली आहे की, THR वितरण हे केवळ आणि केवळ Daily Tracking मोडुल मधूनच करावे. इतर ठिकाणाहून माहिती भरल्यास ती ग्राह्य धरली जाणार नाही किंवा सिस्टीममध्ये अडचण येईल.
२. व्हिडिओ कॉल किंवा फोटोचे फोटो काढू नका: काही वेळा लाभार्थी समोर नसताना आपण व्हिडिओ कॉल लावून किंवा मोबाईलमधील जुन्या व्हिडिओवरून फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. असे करणे आता पूर्णपणे टाळा. यामुळे अडचणी निर्माण होतील आणि तुमचे THR वितरण सिस्टीमवर दिसणार नाही.
३. लाभार्थीची उपस्थिती अनिवार्य: जेव्हा तुम्ही टीएचआर (THR) देता किंवा लाभार्थ्याचा फोटो बदलता, तेव्हा तो लाभार्थी स्वतः अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय कोणतीही प्रक्रिया करू नका.
४. फोटो बदलण्याबाबतचे नियम: प्रोफाइलमधील फोटो फक्त तेव्हाच बदला, जर आधीचा फोटो व्यवस्थित नसेल किंवा तो व्हिडिओद्वारे काढला असेल. जर फोटो सुस्पष्ट असेल, तर तो बदलण्याची घाई करू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर तुम्ही आज प्रोफाइल फोटो बदलला असेल, तर त्या लाभार्थीला दुसऱ्या दिवशी THR देण्यात यावा. फोटो बदलल्याच दिवशी टीएचआर देऊ नका, ही एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा.
हे ही वाचा: अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाची अपडेट! ‘पोषण ट्रॅकर’मध्ये झाला मोठा बदल; आता ‘या’ कारणामुळे काम होणार सोपं?
ताईंनो, या सर्व बाबींचे पालन केल्यास तुम्हाला ॲपवर काम करताना कोणताही त्रास होणार नाही. या नवीन (Poshan Tracker THR Guidline) तंतोतंत पाळल्यास तुमचे काम सोपे आणि जलद होईल. त्यामुळे आजच या पद्धतीचा अवलंब करा आणि आपल्या इतर अंगणवाडी सेविका मैत्रिणींनाही ही माहिती शेअर करा.
अधिक माहितीसाठी : Poshan Tracker Doot YouTube Channel







