अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाची अपडेट! ‘पोषण ट्रॅकर’मध्ये झाला मोठा बदल; आता ‘या’ कारणामुळे काम होणार सोपं?

Published On: January 7, 2026
Follow Us
Poshan Tracker New Version

पोषण अभियानांतर्गत तंत्रज्ञानाचा वापर करून बालके आणि मातांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी सरकारतर्फे सतत प्रयत्न केले जात आहेत. याच शृंखलेत, सर्व अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि मुख्यसेविका यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. (Poshan Tracker New Version) २४.९.९ आता प्ले स्टोअरवर उपलब्ध झाली असून, यामध्ये ‘नॉमिनी’ (Nominee) जोडण्याची सुविधा देण्यात आली आहे.

पोषण ट्रॅकर: नवीन अपडेट (आवृत्ती २४.९.९)

बऱ्याचदा गरोदर माता किंवा स्तनदा माता प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा बाळंतपणामुळे प्रत्यक्ष अंगणवाडी केंद्रात आहार (THR) घेण्यासाठी येऊ शकत नाहीत. अशा वेळी त्यांना आहारापासून वंचित राहावे लागत असे किंवा सेविकांना FRS (चेहरा पडताळणी) करण्यात अडचणी येत होत्या. यावर तोडगा म्हणून नवीन (Poshan Tracker New Version) मध्ये ‘नॉमिनी’ सुविधा आणली आहे.

या सुविधेमुळे आता लाभार्थी महिला स्वतः हजर नसली तरी, तिच्या कुटुंबातील १८ वर्षांवरील कोणत्याही जबाबदार सदस्याला (उदा. पती, सासू, सासरे, इ.) ‘नॉमिनी‘ म्हणून ॲपमध्ये जोडता येणार आहे. यामुळे कुटुंबातील व्यक्तीने अंगणवाडीत येऊन चेहरा स्कॅन केल्यास, संबंधित लाभार्थ्याचा आहार वितरित केला जाईल.

नॉमिनी जोडण्याची प्रक्रिया सोपी

१. ॲपमध्ये लाभार्थ्याच्या नावासमोरील तीन ठिपक्यांवर क्लिक करून ‘Add Nominee for THR’ हा पर्याय निवडावा.

२. लाभार्थ्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP टाकून पडताळणी करावी.

३. त्यानंतर नॉमिनी म्हणून ज्या व्यक्तीला जोडायचे आहे, त्यांचे आधार कार्ड तपशील आणि नाते निवडावे.

४. नॉमिनीची ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करून त्यांचा फोटो काढावा.

५. एकदा नॉमिनी जोडला की, दुसऱ्या दिवसापासून THR देताना सेविकांना लाभार्थी किंवा नॉमिनी यांपैकी कोणाचाही फोटो घेऊन आहार वाटप करता येईल.

केवळ गरोदर आणि स्तनदा माताच नव्हे, तर पुढील येणाऱ्या (Poshan Tracker New Version) २५.१ मध्ये आकांक्षीत जिल्ह्यांतील (Aspirational Districts) किशोरवयीन मुलींसाठीही ही नॉमिनी सुविधा लागू असणार आहे. त्यामुळे किशोरवयीन मुली शाळेत किंवा कामावर गेल्या असल्यास, त्यांच्या पालकांना आहार घेता येईल.

Poshan Tracker App New Version

महत्त्वाचे नियम

  • नॉमिनीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • एका लाभार्थ्यासाठी एकाच व्यक्तीला नॉमिनी बनवता येईल.

ही सुविधा अंगणवाडी सेविकांचे काम सोपे करण्यासाठी आणि प्रत्येक गरजू मातेपर्यंत आहार पोहोचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.अधिक माहितीसाठी आणि ही प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्यासाठी खालील व्हिडिओ नक्की पहा: व्हिडिओ लिंक: THR नॉमिनी सुविधा – YouTube

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment