प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा निधी मंजूर, ‘या’ महिलांना मिळणार लाभ!

Published On: January 4, 2026
Follow Us
pradhan mantri Matru Vandana Yojana

राज्यातील गर्भवती माता आणि भगिनींसाठी एक महत्वाची अपडेट अशी आहे की, राज्य शासनाने २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षाकरिता प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे प्रलंबित असलेल्या किंवा नव्याने अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना त्यांचा लाभ वेळेत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महिला व बाल विकास विभागाने २ जानेवारी २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, या योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी आणि अंमलबजावणीसाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हा निधी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांना वितरीत करण्यात आला असून, यामुळे योजनेचे कामकाज गतिमान होणार आहे. प्रशासकीय स्तरावर निधी उपलब्ध झाल्यामुळे आता पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करणे आणि त्यांना (Matru Vandana Yojana) चा लाभ देणे अधिक सुलभ होणार आहे.

Matru Vandana Yojana योजनेचे स्वरूप आणि लाभ

गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करणे आणि माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या (Matru Vandana Yojana) अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना खालीलप्रमाणे आर्थिक मदत दिली जाते:

पहिल्या अपत्यासाठी: एकूण ₹5,000 चा लाभ दोन टप्प्यांत दिला जातो.

  • पहिला हप्ता: ₹3,000 (गर्भधारणा नोंदणी आणि प्रसूतीपूर्व तपासणीनंतर).
  • दुसरा हप्ता: ₹2,000 (बाळाचा जन्म आणि प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यावर).

दुसरे अपत्य (मुलगी असल्यास): जर दुसरे अपत्य मुलगी असेल, तर मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात ₹6,000 चा लाभ दिला जातो. हा लाभ थेट लाभार्थी महिलेच्या आधार लिंक असलेल्या बँक किंवा पोस्ट खात्यात जमा (DBT) केला जातो.

कोणत्या महिला पात्र आहेत?

प्रधानमंत्री (Matru Vandana Yojana) चा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 18 ते 55 वर्षांच्या दरम्यान असावे लागते. तसेच खालीलपैकी किमान एक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा कमी आहे.
  • अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील महिला.
  • बीपीएल (BPL) शिधापत्रिकाधारक.
  • ई-श्रम कार्ड धारक.
  • पीएम जन आरोग्य योजना (PMJAY) लाभार्थी.
  • मनरेगा जॉब कार्ड धारक.
  • शेतकरी सन्मान निधीच्या लाभार्थी महिला.
  • 40% पेक्षा जास्त दिव्यांग महिला.
  • अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत रेशनकार्डधारक.
  • गर्भवती/स्तनदा अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा आशा सेविका.

आवश्यक कागदपत्रे

लाभार्थ्याने वरील नमूद किमान एका तपशीलसह खालील कागदपत्रे व माहिती देणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, एमसीपी (MCP) कार्ड, बाळाचा जन्म दाखला आणि बँक खात्याचा तपशील आवश्यक आहे. संपूर्ण कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे

  • आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी (EID) कागदपत्र
  • परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड ज्यामध्ये शेवटच्या मासिक पाळीची तारीख, गरोदरपणाची नोंदणी तारीख, प्रसुतीपूर्व तपासणीच्या नोंदी असाव्यात.
  • बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.
  • माता आणि बाल संरक्षण कार्डवर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत.
  • गरोदरपणाची नोंदणी केलेला RCH पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांक.
  • लाभार्थीचा स्वतः चा किंवा कुटूंबातील सदस्यांचा मोबाईल क्रमांक.
  • वेळोवेळी विहित केलेले अन्य कागदपत्र.

अर्ज कुठे आणि कसा करावा?

पात्र महिलांनी आपल्या गावातील किंवा परिसरातील अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून आपला अर्ज भरावा. अंगणवाडी सेविका नवीन पोर्टलवर (PMMVY 2.0) तुमची नोंदणी करतील. अर्जासोबत स्वाक्षरी केलेले हमीपत्र आणि वरील कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.

आता (Matru Vandana Yojana) साठी निधी उपलब्ध झाल्यामुळे प्रलंबित अर्जांवर लवकर कार्यवाही होण्याची शक्यता आहे, तरी पात्र महिलांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी.

राज्यातील पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्वरित आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना शासन आदेश येथे डाउनलोड करा | निधी मंजुरीचा शासन निर्णय येथे डाउनलोड करा

हे ही वाचा : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना: तुम्ही यासाठी पात्र आहात का? लगेच तपासा आणि अर्ज करा!

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment