Post Office GDS Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या 44,228 रिक्त जागांसाठी महाभरती जाहीर केली गेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन मोडद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात 3000 हून अधिक जागा उपलब्ध आहेत. ही भरती डाक सेवक, ब्रांच पोस्टमास्तर आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर साठी उपलब्ध आहे. ही अधिसूचना 12 जुलै 2024 रोजी प्रकाशित केली असून तुम्ही 5 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकता. Post Office GDS Bharti 2024
पदांची माहिती | Post Office GDS Bharti 2024
- डाक सेवक
- ब्रांच पोस्टमास्तर
- असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर
- एकूण जागा: 44228
शैक्षणिक पात्रता | Eligibility criteria for GDS Bharti Post Office 2024
अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. यासोबतच संगणक साक्षरता आणि सायकलिंगचा अनुभव असणे देखील आवश्यक असणार आहे.
महावितरणमधे 6222 पदांसाठी मेगा भरती, पात्रता फक्त 12वी पास; ही आहे अर्जाची अंतिम तारीख
पगार | Salary Information
ब्रांच पोस्टमास्तर साठी पगार रु. 12,000 ते रु. 29,380 असणार आहे.
असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर आणि डाक सेवक साठी पगार रु. 10,000 ते रु. 24,470 असणार आहे.
वयोमार्यादा | Age Criteria
किमान 18 वर्षे, कमाल 40 वर्षे. उमेदवारांना आरक्षणानुसार वयात सवलत दिली जाईल. अधिक माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा आणि वाचा.
अर्ज प्रक्रिया | Application Process for GDS Bharti Post Office 2024
Post Office GDS Bharti 2024 या भरतीसाठी जे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू इच्छितात त्यांनी हे लक्षात घ्यावे की इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज येथे स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकचा वापर करून अर्ज सादर करायचा आहे.
भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी! तब्बल इतक्या पदांसाठी होणार भरती जाहिरात येथे पाहा
निवड प्रक्रिया | Selection Process
ऑनलाइन प्रणालीद्वारे उमेदवारांची शॉर्टलिस्ट तयार केली जाईल. त्यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीनंतर गुणवत्ता यादीही (मेरिट लिस्ट) तयार केली जाईल. या ठिकाणी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांनी नोंद घ्यावी की येथे उमेदवाराची निवड त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल.
आवश्यक कागदपत्रे | Important Documents
ज्यावेळी उमेदवाराची निवड होईल तेव्हा उमेदवाराला मूळ कागदपत्रांसह, या कागदपत्रांची एक कॉपी सादर करावी लागेल.
- इयत्ता 10वी/12वीची मार्कशीट आणि प्रमाणपत्र
- ओळख प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- दिव्यांग (अपंगत्व) प्रमाणपत्र
- आर्थिक दृष्ट्या मागास असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- जन्मतारीख प्रमाणपत्र
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- इतर काही आवश्यक कागदपत्रे
महावितरणमधे 6222 पदांसाठी मेगा भरती, पात्रता फक्त 12वी पास; ही आहे अर्जाची अंतिम तारीख
अर्ज फी | Application Fees
उमेदवाराने ऑनलाइन मोडद्वारे 100 रुपये अर्ज शुल्क जमा करावे. कोणत्याही प्रकारचे शुल्क हे महिला उमेदवार, अपंग उमेदवार, अनुसूचित जातीचे उमेदवार आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांकडून आकारण्यात येणार नाही.
राज्यातील या उमेदवारांना आता सरकारी नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण लागू
महत्वाच्या इतर सूचना | GDS Bharti Post Office 2024
- पोस्ट ऑफिस द्वारे करण्यात येणारी ही भरती रद्द किंवा स्थगित करण्याचा पूर्ण अधिकार पोस्ट ऑफिस चा असणार आहे.
- कोणत्याही कारणास्तव पोस्ट ऑफिसद्वारे ईमेल किंवा एसएमएस पाठवल्यानंतर, तो तुम्हाला प्राप्त होणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराला त्याचा ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अचूकपणे द्यावा लागेल. पोस्ट ऑफिसचा कोणताही मेसेज किंवा कोणताही मेल न आल्यास त्याची जबाबदारी पोस्ट ऑफिस ची नसेल.
- पोस्ट ऑफिसद्वारे उमेदवार निवडीसाठी कोणतेही फोन कॉल केले जात नाहीत, त्यामुळे उमेदवारांनी अशा फोन कॉलला बळी पडू नये.
- उमेदवार नोंदणी क्रमांक वापरून त्यांचा अर्ज ऑनलाइन तपासू शकतात आणि त्यांच्या अर्जाचे स्टेटस देखील जाणून घेऊ शकतात. खाली दिलेल्या लिंकला भेट देऊन उमेदवार यशस्वीरित्या अर्ज पूर्ण करू शकतात.
- या भरतीसाठी तुम्ही अर्ज कसा करायचा आणि कागदपत्रे अपलोड कशी करायची याची माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे. खाली दिलेल्या लिंकचा वापर करून संपूर्ण जाहिरात उमेदवाराने डाउनलोड करावी, ती वाचा आणि त्यानंतरच अर्ज सबमिट करावा.
महत्वाच्या लिंक
- मूळ जाहिरात PDF : येथे पाहा
- रिक्त जागांची माहिती : राज्यनिहाय तपशील येथे पाहा
- ऑनलाइन अर्ज करा : येथे करा
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : https://indiapostgdsonline.gov.in/