सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राज्यभर अभियान स्वरूपात राबविण्यात येत आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार ३१ मार्च २०२६ पर्यंत ठरवलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी या मोहिमांना अधिक वेग देण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत सुरू असलेल्या या उपक्रमांना राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) तसेच NHM Programme चा आधार असून जिल्हास्तरावर समन्वित अंमलबजावणी केली जात आहे.
राज्यातील आरोग्य सेवांचा व्याप वाढवणे, लवकर निदान आणि वेळेवर उपचार यावर भर देणे, हा या मोहिमांचा प्रमुख उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर (Rashtriya Arogya Abhiya) अंतर्गत विविध आरोग्य कार्यक्रमांची प्रगती पुढीलप्रमाणे आहे.
‘अरुणोदय’ सिकलसेल अॅनेमिया विशेष अभियान
१५ जानेवारी २०२६ पासून २१ जिल्ह्यांत ० ते ४० वयोगटातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर तपासणी सुरू आहे. आतापर्यंत ४०,०५,७५० नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १,०६३ रुग्ण आणि १७,६७९ वाहक आढळून आले आहेत.
संशयित रुग्णांसाठी पुढील तपासण्या, समुपदेशन आणि आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आदिवासी व दुर्गम भागांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करून तपासणी वाढविण्यावर भर दिला जात आहे.
आरोग्य विभाग: वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार जाहीर, संपूर्ण यादी
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम
८ जानेवारी ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविली जात असून, दरम्यान ३३४ हृदय शस्त्रक्रिया, २,२४० इतर शस्त्रक्रिया (हर्निया, क्लेफ्ट लिप इ.) यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या. बालकांमध्ये जन्मजात आजारांचे लवकर निदान आणि मोफत शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
तीव्र रक्तक्षय असलेल्या गरोदर मातांसाठी विशेष उपचार
१ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान राज्यातील शासकीय आरोग्य संस्था आणि महानगरपालिका रुग्णालयांमध्ये ४,३७२ गरोदर मातांची तपासणी करून तीव्र रक्तक्षय निश्चित करण्यात आला. त्यापैकी ३,९६३ मातांना IV Iron Sucrose किंवा Ferric Carboxy Maltose उपचार देण्यात आले आहेत.
रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी अपेक्षित प्रमाणात वाढेपर्यंत नियमित तपासणी आणि पाठपुरावा केला जात आहे. मातामृत्यू कमी करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरत आहे.
हत्तीरोग (फिलेरियासिस) शस्त्रक्रिया मोहीम
राज्यातील १,७६५ अंडवृद्धी रुग्णांपैकी ९९३ पात्र रुग्ण निश्चित करण्यात आले. जानेवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ६०८ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
- गडचिरोली: २१० शस्त्रक्रिया
- चंद्रपूर: १३० शस्त्रक्रिया
दुर्गम जिल्ह्यांमध्ये विशेष कॅम्पद्वारे शस्त्रक्रिया वेगात पूर्ण केल्या जात आहेत.
‘हिवताप मुक्त गडचिरोली’ अभियान
मलेरिया नियंत्रणासाठी उच्च जोखीम PHC चे दैनंदिन मॉनिटरिंग, LLIN मच्छरदाण्यांचे वितरण, IRS फवारणी आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
डॉ. अभय बंग यांच्या मार्गदर्शनाखाली Gates Foundation, CHRI-PATH, Clinton Health Access Initiative, FHI 360 आणि TCI यांच्या सहकार्याने समन्वित प्रयत्न सुरू आहेत. गडचिरोलीला मलेरियामुक्त करण्याचा उद्देश ठेवून (Rashtriya Arogya Abhiya) अंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे.
क्षयरुग्णांसाठी फूड बास्केट योजना
१ जानेवारी ते ३१ मार्च २०२६ दरम्यान उपचाराधीन टीबी रुग्णांना पोषण सहाय्य म्हणून अन्नधान्य किट दिली जात आहे.
- राज्यात ३६,५०७ निक्षय मित्र नोंदणीकृत
- १,५७,१७३ रुग्ण उपचाराधीन
- १,०९,१७४ रुग्णांनी किटसाठी संमती दिली
- २२,२०१ रुग्णांना किटचे वितरण पूर्ण
रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आणि उपचार यशस्वी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
कुष्ठरोग प्रतिबंध (PEP) मोहीम
सन २०२७ पर्यंत शून्य प्रसार साध्य करण्यासाठी विशेष पीईपी मोहीम राबविण्यात येत आहे.
- १६,७६१ रुग्णांची नोंद
- ४,४७,२९६ सहवासितांची तपासणी
- ३,२५,४६० हून अधिक व्यक्तींना SDR प्रतिबंधात्मक उपचार
एकही सहवासित उपचारांपासून वंचित राहू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग (NCD) विशेष तपासणी
३० वर्षांवरील नागरिकांसाठी उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी मोहीम राबविली जात आहे. आयुष्मान आरोग्य मंदिर, NCD क्लिनिक आणि इतर आरोग्य संस्थांमार्फत PBS पद्धतीने तपासणी केली जात आहे.
१ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६:
- ९,४१,६७४ नागरिकांची उच्च रक्तदाब तपासणी – ६२,६९३ उपचाराधीन
- ८,५०,८५७ नागरिकांची मधुमेह तपासणी – ३६,३२७ उपचाराधीन
- दोन्ही आजार असलेले २१,९६७ रुग्ण – २०,७७३ उपचार सुरू
लवकर निदान आणि सातत्यपूर्ण उपचारावर विशेष भर देण्यात येत आहे.
नागरिकांना आवाहन
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नागरिकांनी वेळेत तपासणी करून घ्यावी, नियमित उपचार घ्यावेत आणि आरोग्य मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. शासन गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकूणच, राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या मोहिमा राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी देत आहेत. (Rashtriya Arogya Abhiya) च्या माध्यमातून प्रतिबंध, लवकर निदान आणि प्रभावी उपचार या त्रिसूत्रीवर राज्य प्रशासनाचा भर कायम आहे.







