सन 2025-26 अतिरिक्त शिक्षक समायोजन – महत्त्वाचे शुद्धीपत्रक आणि पुढील वेळापत्रक

Published On: February 23, 2026
Follow Us
atirikat shikshak samayojan velaptrak

सन २०२५-२६ च्या संचमान्यता नुसार अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचे वेळापत्रक जाहीर झालेले असून, या प्रक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाचे शुद्धीपत्रक शिक्षण संचालनालयाने जारी केले आहे. याबाबत महत्वाची अपडेट पाहूया.

महत्त्वाचे शुद्धीपत्रक (२० फेब्रुवारी २०२६)

शिक्षण संचालनालयाने ४ फेब्रुवारी २०२६ च्या मूळ पत्रासंदर्भात एक नवीन शुद्धीपत्रक जारी केले आहे.

या पत्रानुसार, मूळ आदेशातील परिच्छेद क्र. ६ मध्ये पहिल्या ओळीत नजरचुकीने आलेला “सन २०२४-२५ च्या संच मान्यतेनुसार” हा उल्लेख आता “सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार” असा वाचायचा आहे.

shikshk samayojan

त्यामुळे ही संपूर्ण समायोजन प्रक्रिया २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसारच पार पडत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

सद्यस्थिती आणि पुढील महत्त्वाच्या तारखा (जिल्हा स्तर)

वेळापत्रकानुसार, १३ फेब्रुवारीची तात्पुरती यादी घोषित करण्याची आणि २० फेब्रुवारीपर्यंत आक्षेप/हरकती नोंदवण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता पुढील महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत.

२५ फेब्रुवारी २०२६: रिक्त जागा (संवर्ग, विषय, इयत्ता निहाय) व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी घोषित करणे.

०३ मार्च २०२६: समुपदेशनाद्वारे प्रत्यक्ष समायोजन करणे.

०६ मार्च २०२६: पुढील कार्यवाहीसाठी विभागस्तरावर यादी सादर करणे.

सर्व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी येत्या २५ तारखेच्या अंतिम यादीकडे लक्ष ठेवावे आणि ३ मार्च रोजी होणाऱ्या समुपदेशनासाठी तयार राहावे.

shikshak samayojan velaptrak

अधिक माहितीसाठी : अतिरिक्त शिक्षक समायोजन 2025-26: वेळापत्रक पहा जिल्हा व विभाग स्तरावरील संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Janganana Employees Leave Latest Circular

जनगणना 2027: शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द? परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेश जारी

March 7, 2026
Shalarth Thakit Bill

Shalarth Thakit Bill: थकित देयके या तारखेपर्यंत निकाली निघणार, थकीत बिल किती मिळणार? चेक करा

March 5, 2026
Kendrapramukh Bhrati

केंद्रप्रमुख भरती परीक्षा निकालाची तारीख जाहीर? शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची विधानसभेत माहिती

March 4, 2026
shikshaketar karmchari gazette 2026

राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी पात्रता बदलली! महाराष्ट्र शासन राजपत्र प्रसिद्ध

March 3, 2026
PM POSHAN aahar mandhan gr

PM POSHAN अंतर्गत स्वयंपाकी आणि मदतनीस यांना वाढीव मानधनाचा लाभ मंजूर, शासन निर्णय जारी

March 3, 2026

शिक्षकांचे अशैक्षणिक कामातून सुटका होणार? शालेय शिक्षण राज्यमंत्री यांची विधानपरिषदेत माहिती

February 25, 2026

Leave a Comment