‘समग्र शिक्षा’ अभियानातील ३७८४ कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा निर्णय! वाचा काय म्हणाले शिक्षणमंत्री! Samagra Shiksha Karar Karmachari Nirnay Update

By Marathi Alert

Published on:

Samagra Shiksha Karar Karmachari Nirnay Update: समग्र शिक्षा अभियानातील ३७८४ करार कर्मचाऱ्यांच्या समायोजनासंदर्भात शासनाने समिती गठीत केली असून, तीन महिन्यांत अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.

समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय!

विधानपरिषद सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी या कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी समायोजनासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मंत्री भुसे म्हणाले की, एकूण १६,१०० मंजूर पदांपैकी सध्या ८२६९ कर्मचारी कार्यरत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तसेच, २९८४ कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित ३७८४ कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार १४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासनाने समिती गठीत केली आहे.

राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार न्याय! सरकारकडून मोठा खुलासा!

समितीचा अहवाल तीन महिन्यात Samagra Shiksha Karar Karmachari Nirnay Update

समग्र शिक्षा अभियानातील ३७८४ कर्मचाऱ्यांबाबत सरकारला शिफारस करण्यासाठी अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल तीन महिन्यात प्राप्त होईल. त्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

विधानपरिषदेतील चर्चा

विधानपरिषद सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करणार का? याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या अनुषंगाने अधिक माहिती देताना शालेय शिक्षणमंत्री भुसे म्हणाले, समग्र शिक्षा अभियानातील उर्वरित ३७८४ कर्मचाऱ्यांबाबत शासनास शिफारस करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमधील निर्णयानुसार समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.

या प्रश्नाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य अभिजीत वंजारी आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सहभाग घेतला. (Samagra Shiksha Karar Karmachari)

समग्र शिक्षा अभियानांतर्गत ५६४३ कर्मचाऱ्यांना १० टक्के वाढ लाभ मिळणार 

इतर शिक्षक, कर्मचाऱ्यांशी चर्चा

याशिवाय, शासन सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्याची सूचना सभापती प्रा. राम शिंदे यांनी केली. त्यास अनुसरून त्यांच्याशी लवकरच चर्चा केली जाईल, असेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले. (Samagra Shiksha Karar Karmachari Nirnay Update)

अधिक माहितीसाठी: तारांकित प्रश्न लेखी उत्तरे यादी पाहा

कंत्राटी विशेष शिक्षकांना कायम करण्याचा निर्णय! विशेष शिक्षकांची नियुक्ती का थांबली? सर्वोच्च न्यायालय

समग्र शिक्षा अंतर्गत विविध पदांची भरती

Leave a Comment

error: Content is protected !!