School News: विद्यार्थ्यांच्या दप्तराला आता शनिवारी सुट्टी; शिक्षण विभागाचा निर्णय

Published On: June 15, 2024
Follow Us
School News

Happy Saturday: विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

आनंददायी शनिवार ‘या’ उपक्रमाचा उद्देश

  1. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.
  2. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे.
  3. शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे.
  4. विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे.
  5. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्येवरमात करण्याची क्षमता निर्माण करणे.
  6. विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे.

आनंददायी शनिवार उपक्रमात ‘या’ कृतीचा समावेश

  1. प्राणायाम/योग/ध्यान धारणा / श्वसनाची तंत्रे
  2. आपत्ती व्यवस्थापनातची मुलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण
  3. दैनंदीन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन
  4. स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना
  5. रस्ते सुरक्षा
  6. समस्या निराकरणाची तंत्रे
  7. कृती, खेळ यावर आधारित उपक्रम
  8. Mindfulness वर आधारित कृती व उपक्रम
  9. नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य

वरील कृतीसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपुर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांनाअसणार आहे.

आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवत असतांना प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्गाऐवजी विद्यार्थ्यांचा शनिवार हा वरील कार्यपध्दतीनदवारे आंनददायी स्वरुपाचा होण्याच्या दृष्टिने आयुक्त (शिक्षण), पुणे व संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी एकत्रितपणे रुपरेषा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

हा उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल, त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन व्हावे या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी “आनंददायी शनिवार” हा उपक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात येत आहे. (अधिक माहितीसाठी- शासन निर्णय)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment