State CET Cell Final Schedule 2026: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (State CET Cell) २०२६ या वर्षासाठी उच्च शिक्षण विभागाच्या विविध कोर्सेसच्या तसेच तांत्रिक शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. जर तुम्ही या परीक्षांसाठी अर्ज केला असेल, तर तुमच्यासाठी या तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
Higher Education Final Schedule of CET 2026: परीक्षेच्या अंतिम तारखा
CET सेलने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत नोटीसनुसार, विविध पदवी आणि पदव्युत्तर कोर्सेसच्या परीक्षा मार्च आणि एप्रिल महिन्यात घेतल्या जाणार आहेत. या तारखांचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
- MAH-M.P.Ed. CET-2026 – 24-03-2026
- MAH-M.P.Ed Field Test (Offline) – 25-03-2026
- MAH-M.Ed CET-2026 – 25-03-2026
- MAH-B.Ed (General & Special) & B.Ed ELCT-CET-2026 – 27-03-2026 to 29-03-2026
- MAH-L.L.B. 3 Yrs. CET-2026 – 01-04-2026 to 02-04-2026
- MAH-B.P.Ed CET-2026 – 04-04-2026
- MAH-B.P.Ed Field Test (Offline) – 05-04-2026 to 07-04-2026
- MAH-B.Ed.M.Ed (Three Year Integrated Course) CET-2026 – 09-04-2026
- MAH-LLB (5 Years) CET-2026 – 08-05-2026

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षांसाठी यशस्वीरित्या ऑनलाइन अर्ज भरले आहेत, त्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी.
अधिकृत संकेतस्थळ: प्रवेशपत्राबाबत (Admit Card) आणि परीक्षेच्या इतर महत्त्वाच्या सूचनांसाठी उमेदवारांनी नियमितपणे www.mahacet.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
विद्यार्थ्यांनी आपल्या कोर्सेनुसार वरील अंतिम तारखा लक्षात घेऊन आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे.
काही शंका असल्यास उमेदवार CET सेलच्या 022-22016157/53/59 या क्रमांकावर किंवा cetcell@mahacet.org या ईमेलवर संपर्क साधू शकतात. हे वेळापत्रक ११ मार्च २०२६ रोजी आयुक्त आणि सक्षम अधिकारी, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्याद्वारे अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी: https://cetcell.mahacet.org/

Technical Education final Schedule of CET 2026
महाराष्ट्र शासनाच्या स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने जाहीर केलेल्या अधिकृत नोटीसनुसार, विविध पदवी आणि पदव्युत्तर कोर्सेसच्या परीक्षा मार्च ते मे २०२६ दरम्यान घेतल्या जातील. विशेष म्हणजे, यावर्षी MHT CET आणि MBA CET साठी दुसऱ्या संधीचे (Second CET) आयोजन देखील करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या परीक्षांचे वेळापत्रक (प्रथम सत्र)
- MAH-M.HMCT CET-2026 – 25-03-2026
- MAH-MCA CET-2026 – 30-03-2026
- MAH-B.Design CET-2026 – 05-04-2026
- MAH-MBA/MMS CET-2026 – 06-04-2026 to 08-04-2026
- MAH-MHT CET (PCM Group) 2026 – 11-04-2026 to 20-04-2026
- MAH-MHT CET (PCB Group) 2026 – 21-04-2026 to 26-04-2026
- MAH-B.HMCT / BCA / BBA / BMS / BBM CET-2026 – 28-04-2026 to 30-04-2026
दुसरी MHT CET आणि MBA CET २०२६ (Second Chance)
ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रात काही कारणास्तव परीक्षा देता आली नाही किंवा गुण सुधारायचे आहेत, त्यांच्यासाठी खालीलप्रमाणे दुसऱ्या परीक्षेचे आयोजन केले आहे.
- MAH-MBA/MMS-CET: ०९ मे २०२६
- MHT CET (PCB Group): १० मे ते ११ मे २०२६
- MHT CET (PCM Group): १२ मे ते १६ मे २०२६
विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना
१. अधिकृत वेबसाइट: हॉल तिकीट (Admit Card) आणि इतर अपडेट्ससाठी उमेदवारांनी नियमितपणे www.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
२. प्रवेशपत्र: ज्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज यशस्वीरीत्या सादर केले आहेत, त्यांनाच परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करता येईल.
३. नियोजन: परीक्षेच्या अंतिम तारखा जाहीर झाल्या असल्याने विद्यार्थ्यांनी आता आपला अभ्यासाचा वेग वाढवून नियोजित वेळेत तयारी पूर्ण करावी.
संपर्क माहिती: काही शंका असल्यास तुम्ही CET सेलच्या 022-22016157 या क्रमांकावर किंवा cetcell@mahacet.org या ई-मेलवर संपर्क साधू शकता.









