Teacher Transfer 2024: राज्यातील जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात आता नवीन सुधारित धोरण जाहीर करण्यात आले असून, याबाबतचा शासन निर्णय दिनांक 18 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद शिक्षक बदली धोरणात बदल! | Teacher Transfer 2024
सुधारित जिल्हाअंतर्गत बदली धोरणानुसार आता अवघड क्षेत्र, सर्वसाधारण क्षेत्र, बदली वर्ष व अन्य मुद्यांबाबतच्या व्याख्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा आता धरण्यात येणार आहे.
बदली अधिकार प्राप्त शिक्षक : बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा 3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक बदलीस पात्र असणार आहे.
अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिध्द केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणुन घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा 3 वर्ष झालेली असेल तर, त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राहय धरण्यात येईल.
बदली प्रक्रीयेमधून वगळण्यात येणारे शिक्षक
- पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत असे शिक्षक
- बदली प्रक्रीया सुरु असताना निलंबित / सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक.
- विशेष संवर्ग शिक्षक भाग -1
- विधवा शिक्षक
- दिव्यांग शिक्षक
- परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक
- वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक
- कुमारिका शिक्षक
- स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा/मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)
- गंभीर आजारग्रस्त शिक्षक
जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निक्षित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करताना उद्भवणाऱ्या अडी-अडचणी विचारात घेऊन ऑनलाईन बदल्यांबाबतचे सुधारित बदली धोरण निश्चित करण्यात आले आहे.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत शासन निर्णय पाहा : शासन निर्णय (दि 18 जून 2024)