महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam 2025) संदर्भात दोन महत्त्वाचे प्रसिद्धी निवेदन नुकतेच जारी करण्यात आले आहेत. या निवेदनांनुसार, परीक्षेची तारीख आणि कमी उमेदवार संख्या असलेल्या माध्यमांसाठी परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, तसेच उमेदवारांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
TET Exam ची तारीख आणि कमी उमेदवार संख्या असलेल्या माध्यमांसाठी केंद्रे निश्चित
महाराष्ट्र शासनाच्या वतीने २३ ऑगस्ट २०१३ च्या शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत TET Exam – २०२५ चे आयोजन रविवार, दिनांक २३/११/२०२५ रोजी करणे नियोजित आहे.
ज्या उमेदवारांची संख्या राज्यामध्ये कमी आहे, अशा बंगाली, कन्नड, तेलगु आणि गुजराथी माध्यमांच्या विद्यार्थी/उमेदवारांसाठी परीक्षा केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याबाबतची माहिती उमेदवारांनी घ्यावी.
बंगाली माध्यम: या माध्यमासाठी मुंबई वेस्ट, मुंबई नॉर्थ, पालघर, पुणे, धुळे, नंदुरबार, जालना, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली अशा विविध जिल्ह्यांतील उमेदवारांना पुणे आणि चंद्रपूर येथे परीक्षा केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
कन्नड माध्यम: या माध्यमातील उमेदवारांना ठाणे, सोलापूर आणि सांगली येथे परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत.
तेलगु माध्यम: तेलगु माध्यमाच्या उमेदवारांसाठी पुणे येथे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
गुजराथी माध्यम: या माध्यमातील उमेदवारांसाठी ठाणे आणि नंदुरबार येथे परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांपासून सावध राहा!
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सर्व उमेदवारांना सूचित केले आहे की, TET Exam – २०२५ च्या आयोजनाची कार्यवाही सध्या सुरू आहे. परीक्षेसंबंधित कोणतीही अधिकृत माहिती केवळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in आणि http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळांवर वेळोवेळी दिली जाते.
TET आणि CTET समकक्ष: शिक्षक भरतीसाठी (PAVITRA Portal) केंद्रीय पात्रता परीक्षा वैध
त्यामुळे, युट्युब चॅनेल्स, सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स किंवा प्रसार माध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या/अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन परिषदेने केले आहे. कोणत्याही चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार/विद्यार्थी सर्वस्वी जबाबदार असतील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी
- प्रसिद्धी निवेदन क्र. १
- प्रसिद्धी निवेदन क्र. २
- अधिकृत वेबसाईट : https://www.mscepune.in/



