Thane Mahanagar Palika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिका ने गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील १७७३ रिक्त पदांसाठी सरळसेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा आणि निमवैद्यकीय सेवा यांसारख्या विविध सेवांमधील पदांचा समावेश आहे.
Thane Mahanagar Palika Bharti 2025
रिक्त पदांचा तपशील
एकूण १७७३ पदांपैकी काही प्रमुख पदे आणि त्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे:
- फायरमन: ३८१ पदे
- नर्स मिडवाईफ / परिचारिका / स्टाफ नर्स: ४५७ पदे
- चालक-यंत्रचालक: २०७ पदे
- कनिष्ठ अभियंता-२: ६३ पदे
- ज्युनियर टेक्निशियन: ६० पदे
- लिपिक तथा टंकलेखक: ५३ पदे
- दवाखाना आया: ४८ पदे
- औषध निर्माण अधिकारी: ३६ पदे
- वॉर्डबॉय: ३७ पदे
परीक्षा शुल्क
- अमागास प्रवर्ग: रु. १,०००/-
- मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग: रु. ९००/-
- माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांना शुल्क माफ आहे.
- अर्ज आणि परीक्षा शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
- एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास, प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि शुल्क भरणे अनिवार्य आहे.
- परीक्षा शुल्क नॉन-रिफंडेबल (परत न करण्यायोग्य) आहे.
हे ही वाचा : राज्य कर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी पदांसाठी MPSC ची बंपर भरती!
अर्ज करण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा:
अर्ज कसा करावा: इच्छुक आणि पात्र उमेदवार ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट www.thanecity.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज सादर करण्याचा कालावधी: १२ ऑगस्ट, २०२५, दुपारी २:०० पासून ते २ सप्टेंबर, २०२५, रात्री ११:५९ पर्यंत.
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत: २ सप्टेंबर, २०२५, रात्री ११:५९ पर्यंत.
प्रवेशपत्र: परीक्षेच्या ७ दिवस आधी ऑनलाइन उपलब्ध होतील.
ऑनलाइन परीक्षेची तारीख: ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल.
अधिक माहितीसाठी
पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता आणि आरक्षणासारख्या सर्वसाधारण सूचना व अटींसाठी उमेदवारांनी ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. तांत्रिक मदतीसाठी ०२२-६१०८७५२० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. जाहिरातीसंदर्भात चौकशीसाठी ०२२-२५४१५४९९ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत (सोमवार ते शुक्रवार, सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:३०) संपर्क साधता येईल.