अकरावी प्रवेश निश्चित करताना हमीपत्र नमुना व स्वयंघोषणा पत्र PDF डाउनलोड करा

Published On: May 31, 2026
Follow Us
Undertaking Form for 11th admission 2026

सध्या राज्यात सन २०२६-२७ च्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नियमित फेरी क्रमांक १ सुरू असून, नुकतीच २९ मे २०२६ रोजी या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. दहावीचा निकाल लागूनही अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमधून मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार आता कॉलेज मध्ये अकरावी प्रवेश निश्चित करताना हमीपत्र नमुना (Undertaking Form for 11th admission 2026) भरून आपला प्रवेश विनाअडथळा निश्चित करू शकतात. हमीपत्र Student’s Self Declaration for Minority Quota आणि Student’s Undertaking for Document Upload PDF डाउनलोड करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

11th admission 2026 Undertaking Form Circuler

11 वी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि कनिष्ठ महाविद्यालयांना यासंदर्भात स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे सध्या मूळ कागदपत्रे उपलब्ध नाहीत, ते विद्यार्थी हमीपत्र (Undertaking Form for 11th admission 2026) भरून आपला प्रवेश विनाअडथळा निश्चित करू शकतात.

या अर्जाद्वारे, गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध होताच तो त्वरित महाविद्यालयात जमा केला जाईल, असे लेखी आश्वासन विद्यार्थ्यांना द्यावे लागते. याशिवाय, आधार व्हेरिफाइड विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी त्यांच्या गुणपत्रिका आता डिजीलॉकरमध्येही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्याचा उपयोग प्रवेश प्रक्रियेदरम्यान घेता येईल.

हे हमीपत्र (Undertaking Form for 11th admission 2026) भरताना विद्यार्थ्यांनी स्वतःची सर्व अचूक माहिती, प्रवेश अर्ज क्रमांक, जात प्रवर्ग आणि ज्या कागदपत्रांची कमतरता आहे त्याची सद्यस्थिती नमूद करणे आवश्यक असते.

पण विद्यार्थी आणि पालकांनी एका गोष्टीची विशेष नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे की, ही केवळ एक तात्पुरती सवलत आहे. दिलेल्या निर्धारित कालावधीत ही मूळ कागदपत्रे महाविद्यालयात सादर न केल्यास, किंवा प्रवेश अर्जातील माहिती व मूळ कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्यास विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करण्यात येऊ शकतो. याची जाणीव विद्यार्थी व पालकांना करून देण्याच्या सूचनाही कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे कागदपत्रांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत वेळेवर सहभागी होता येईल. यामुळे प्रवेश प्रक्रियेला अधिक गती मिळेल आणि ती विद्यार्थ्यांसाठी अधिक सुलभ होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही चिंता न करता हमीपत्राचा (Undertaking Form for 11th admission 2026) योग्य वापर करून आपला प्रवेश वेळेत निश्चित करून घ्यावा.

Undertaking Form for 11th admission 2026 काय आहे?

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करताना अनेकदा विद्यार्थ्यांकडे सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेवर उपलब्ध नसतात. अशा वेळी प्रवेशाची संधी हुकू नये म्हणून ‘Undertaking Form‘ म्हणजेच हमीपत्राचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. जे विद्यार्थी प्रवेश अर्ज भरतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन सादर किंवा अपलोड करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे हमीपत्र भरणे अनिवार्य असते.

Undertaking Form for 11th admission 2026

या हमीपत्रात विद्यार्थ्याने स्वतःचे नाव, प्रवेश अर्ज क्रमांक, मूळ जात प्रवर्ग, आणि ज्या प्रवर्गातून किंवा आरक्षणातून (जसे की अल्पसंख्याक, धार्मिक किंवा भाषिक) प्रवेश मिळवायचा आहे त्याचा सविस्तर तपशील भरणे आवश्यक असते.

या अर्जावर स्वाक्षरी करून विद्यार्थी ही हमी देतो की, आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी त्याच्याकडे सध्या उपलब्ध असलेली सर्व कागदपत्रे त्याने ऑनलाईन जोडली आहेत आणि उर्वरित सर्व आवश्यक प्रमाणपत्रे तो प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी मूळ प्रतींसह महाविद्यालयात सादर करेल.

विद्यार्थ्यांना एका विशिष्ट तक्त्यामध्ये आपल्या कागदपत्रांची सद्यस्थिती स्पष्ट करावी लागते. यात प्रामुख्याने इयत्ता दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला (L.C.), दहावीचे गुणपत्रक, स्वतःचा किंवा वडिलांचा जातीचा दाखला, कुटुंबाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबतचे नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र (NCL), अन्य आरक्षणाचे प्रमाणपत्र आणि अल्पसंख्याक असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र या महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश असतो. सदर कागदपत्रे अर्जासोबत सध्या अपलोड केली आहेत की ती नंतर प्रवेशाच्या वेळी प्रत्यक्ष सादर करणार आहेत, हे या फॉर्ममध्ये अचूकपणे नमूद करावे लागते.

हे हमीपत्र म्हणजे एक प्रकारे विद्यार्थ्याने दिलेले कायदेशीर आश्वासन असते. प्रवेश अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती स्वतःच्या माहितीनुसार पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचे विद्यार्थी यातून जाहीर करतो. तसेच, प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे वेळेत सादर न केल्यास किंवा मूळ कागदपत्रे आणि अर्जातील माहितीत कोणतीही तफावत आढळल्यास आपला प्रवेश नाकारला जाऊ शकतो किंवा मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो, याची पूर्ण जाणीव असल्याचेही या हमीपत्रात स्पष्ट केलेले असते. सर्वात शेवटी FYJC Self Declaration Form या घोषणापत्रावर विद्यार्थी आणि पालकांच्या स्वाक्षऱ्या असणे बंधनकारक असून, स्वतः स्वाक्षरी केलेले हे हमीपत्र प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर अपलोड करून नंतर पडताळणीसाठी सादर करावे लागते.

Undertaking Form for 11th admission 2026 PDF Download

Student’s Undertaking for Document Upload PDFहमीपत्र डाउनलोड PDF करा
Student’s Self Declaration for Minority Quotaस्वयंघोषणा पत्र PDF डाउनलोड करा
FYJC प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठीअधिकृत वेबसाईट

FYJC Admission Maharashtra

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment