YCMOU Bed Special Document Verification कागदपत्र पडताळणीची संपूर्ण यादी आणि उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी

By MarathiAlert Team

Published on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

YCMOU Bed Special Document Verification यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेअंतर्गत असलेल्या दिव्यांग अध्ययन केंद्राने बी.एड. विशेष शिक्षण (P-21) शिक्षणक्रमाच्या सन २०२५-२८ या तुकडीसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांसाठी एक महत्त्वाची सूचना जाहीर केली आहे.

YCMOU Bed Special Document Verification Update

कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे

कागदपत्र पडताळणीसाठी येताना उमेदवारांनी खालील मूळ कागदपत्रांसह त्यांची प्रत्येकी एक झेरॉक्स प्रत सोबत आणणे बंधनकारक आहे:

  1. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची एक प्रत.
  2. आपला User ID आणि Password.
  3. जन्म तारखेचा पुरावा (उदा. शाळा सोडल्याचा दाखला / आधार कार्ड).
  4. पदवीच्या तिन्ही वर्षांचे गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र. ५. जर अर्जात पदव्युत्तर पदवीचे गुण भरले असतील, तर दोन्ही वर्षांचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
  5. विशेष शिक्षणातील RCI (Rehabilitation Council of India) मान्यताप्राप्त पदविका (उदा. Diploma in Vocational Rehabilitation (DVR) / Diploma in Special Education) संबंधित माहिती भरली असल्यास, त्याचे गुणपत्रक आणि RCI प्रमाणपत्र.
  6. जर आपण य.च.म. मुक्त विद्यापीठातून पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केली असेल, तर त्याची मूळ गुणपत्रके आणि प्रमाणपत्रे.
  7. अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून अर्ज केल्यास, जात प्रमाणपत्र.
  8. अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून अर्ज केल्यास, जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र.
  9. VJ/NT/OBC/SBC आणि EWS प्रवर्गातून अर्ज सादर केला असल्यास, १ एप्रिल २०२५ नंतरचे नॉन क्रिमिलियर (Non-Creamy Layer) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  10. EWS/SBC/ट्रान्सजेंडर उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
  11. जर उमेदवार स्वतः दिव्यांग (Differently-abled) असेल, तर जिल्हा शल्य चिकित्सकाचे किमान ४० टक्के अपंगत्व / दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र आणि UDID कार्ड अनिवार्य.
  12. जर उमेदवाराचे पालक दिव्यांग पाल्याचे आई-वडील असतील, तर पाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकाचे किमान ४० टक्के दिव्यांगत्व असल्याचे UDID कार्ड आवश्यक.
  13. जर उमेदवाराने अनाथ आरक्षणातून अर्ज केला असेल, तर संबंधित कागदपत्रे.
  14. आजी / माजी सैनिक स्वतः / पत्नी / मुलगा / अविवाहित मुलगी असल्यास अधिकृत दस्तऐवज.
  15. EWS प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वेळोवेळी निर्देशित केलेली प्रमाणपत्रे / दस्तऐवज.
  16. अर्जात नोंद केलेल्या सर्व कागदपत्रांची एक साक्षांकित (attested) प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
  17. विवाहित महिला अर्जदाराने लग्नानंतर नावात बदल केला असल्यास, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि राजपत्राची (Gazette) प्रत.

या सूचनेनुसार, ज्या उमेदवारांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरले आहेत, त्यांना विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्यालयात कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि प्रवेश पूर्व चाचणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे. यासंबंधीचे सविस्तर वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर (http://ycmou.digitaluniversity.ac.in) प्रसिद्ध केले जाईल. उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळाला भेट देऊन माहिती घ्यावी.

महत्वाचे नियम आणि सूचना

  • कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी नियोजित दिवशी आणि वेळेनुसार मुख्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  • कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश पूर्व चाचणीस अनुपस्थित राहणारे उमेदवार सन २०२५-२८ च्या प्रवेश प्रक्रियेतून बाद केले जातील.
  • पडताळणी करताना उमेदवारांनी अर्जात भरलेल्या माहितीचे मूळ कागदपत्रांचे पुरावे सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही आणि कोणत्याही प्रकारची नवीन माहिती जोडता येणार नाही.
  • कागदपत्र पडताळणी कक्षात फक्त उमेदवारांनाच प्रवेश दिला जाईल, नातेवाईकांना प्रवेश मिळणार नाही.
  • संचालक, दिव्यांग अध्ययन केंद्र (CDS) गरजेनुसार नियमांमध्ये बदल करू शकतील आणि ते बदल सर्व उमेदवारांना बंधनकारक असतील.
  • प्रवेश समितीवर कोणत्याही प्रकारचा दबाव, धमकी, गैरवर्तन, किंवा गोंधळ घातल्यास भारतीय दंड संहितेनुसार (IPC) कायदेशीर कारवाई केली जाईल.

YCMOU Bed Special Document Verification संदर्भात महत्वाची सूचना पीडीएफ येथे डाउनलोड करा

सर्व उमेदवारांनी अद्ययावत माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला (http://ycmou.digitaluniversity.ac.in) नियमितपणे भेट द्यावी आणि अधिक माहितीसाठी बी.एड. माहितीपुस्तिका वाचावी.

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!