YCMOU Bed Spl Admission 2025 नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (YCMOU) सन 2025-28 सत्रासाठी बी.एड. विशेष शिक्षण अभ्यासक्रमाचे (HI, VI & ID) ऑनलाइन प्रवेश सुरू केले आहेत. विद्यापीठाला ‘नॅक’ द्वारे ‘अ’ श्रेणी मिळाली आहे.
YCMOU Bed Spl Admission 2025 संपूर्ण माहिती
बी.एड. विशेष शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू
‘विशेष शिक्षण’ म्हणजे काय? ‘विशेष शिक्षण’ म्हणजे श्रवणबाधित, दृष्टीबाधित, बौद्धिक अक्षमता, अध्ययन अक्षमता असलेले, अस्थिव्यंग आणि मेंदूसंबंधित दुर्बलता असणाऱ्या, म्हणजेच विशेष शैक्षणिक गरजा असलेल्या विविध प्रकारच्या दिव्यांग मुलांचे शिक्षण होय.
दिव्यांग मुलांचे शिक्षण कुठे होते? दिव्यांगांच्या विशेष शाळेत, मुख्य प्रवाहातील मुलांच्या शाळेत, तसेच समावेशित शिक्षणांतर्गत सर्व शाळांमध्ये प्रवेश दिलेल्या दिव्यांगांना त्यांच्या गरजेनुसार शिक्षण दिले जाते.
‘दिव्यांग’ शब्दाचा वापर: नवीन विचारधारेनुसार या मुलांना आता ‘अपंग’ न संबोधता, त्यांना ‘विशेष गरजा असलेली म्हणजेच दिव्यांग मुले’ असे संबोधले जाते.
विशेष शिक्षकांची गरज आणि प्रशिक्षण: दिव्यांग मुलांचे शिक्षण प्रशिक्षित शिक्षकांशिवाय शक्य नाही. हे विशेष शिक्षक-प्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांना ‘विशेष शिक्षण अध्यापक महाविद्यालय’ असे म्हणतात. भारतीय पुनर्वास परिषद (Rehabilitation Council of India – RCI), नवी दिल्ली, या प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम ठरवते. हा अभ्यासक्रम विद्यापीठात RCI सोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार राबवला जातो. या महाविद्यालयांची विद्यार्थी संख्या आणि प्रवेशाचे निकष यांना भारतीय पुनर्वास परिषदेची मान्यता असते. भारतीय पुनर्वास परिषदेच्या केंद्रीय नोंदणी रजिस्टर (CRR) मध्ये नाव नोंदविल्याशिवाय कोणतीही व्यक्ती किंवा संस्था या विशेष शिक्षक म्हणून या क्षेत्रात काम करू शकत नाही.
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये:
- श्रेयांक: 80 श्रेयांक (1 श्रेयांक म्हणजे 30 ते 35 तासांचा अभ्यास).
- अभ्यास तासिका: 2400-2600 घड्याळी तास.
- शिक्षणक्रम कालावधी: सदर शिक्षणक्रमात पाच सत्रे म्हणजेच अडीच वर्षांचा किमान कालावधी असेल. शिक्षणक्रमाचा नोंदणी कालावधी पाच वर्षांचा असेल. या कालावधीत शिक्षणक्रम यशस्वीपणे पूर्ण न झाल्यास उमेदवारास विद्यापीठाने निश्चित केलेले शुल्क भरून शिक्षणक्रमासाठी पुननोंदणी करावी लागेल.
- अध्ययन साहित्य: अध्ययन साहित्य E-pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल.
शिक्षणक्रमाची उद्दिष्ट्ये:
- मानवी विकास, भारतीय शिक्षण, शालेय विषयासंदर्भातील शिक्षणशास्त्र आणि अध्ययनाचे मूल्यनिर्धारण याविषयी ज्ञान व कौशल्ये आत्मसात करणे.
- विविध अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अपंगत्वाचे स्वरूप व त्यांच्या शैक्षणिक गरजा याबाबत ज्ञान व कौशल्ये आत्मसात करणे.
- विविध अपंगत्व असणाऱ्या मुलांबरोबर विशेष व समावेशित परिस्थितीत काम करण्यासाठी शैक्षणिक तरतुदी व कौशल्ये यांबाबत संकल्पनात्मक आकलन करणे.
- व्यावसायिक विकासासाठी ज्ञान व कौशल्ये वृद्धिंगत करणे.
शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर उपलब्ध संधी:
- बी.एड. विशेष पूर्ण झाल्यावर समावेशित शिक्षणातील युनिटमध्ये शिक्षक म्हणून काम करता येते. तसेच पाच दिव्यांग मुलांमागे एका शिक्षकाची नियुक्ती शाळेतील एकात्म युनिटमध्ये केली जाते.
- महाराष्ट्र शासनाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावर विविध प्रकारच्या दिव्यांगांना शिकविण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची आवश्यकता असते.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व शिक्षा अभियानांतर्गत समावेशित Shadow शिक्षक / विशेष शिक्षक / फिरते शिक्षक म्हणून काम करता येते.
- राष्ट्रीय शिक्षण मोहिमे अंतर्गत लवकरच विषयतज्ज्ञ, विशेष शिक्षक, रिसोर्स टीचर म्हणून या विशेष शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे या शिक्षकांची अधिक गरज आहे.
- नवीन शैक्षणिक धोरण (2020) नुसार विशेष शिक्षक म्हणून रोजगाराची संधी मिळू शकते.
- प्रशिक्षण घेऊन विशेष शाळेत विशेष शिक्षक म्हणूनही काम करता येते.
- बी.एड. नंतर पदविका स्तरावर अधिव्याख्याता म्हणून काम करता येते.
- पदवी प्राप्त केल्यानंतर स्वतः व्यावसायिक म्हणून विशेष शिक्षण क्षेत्रात कार्य करू शकता.
बी.एड. विशेष शिक्षण अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता
भारतीय पुनर्वास परिषद, नवी दिल्ली, यांच्या नियमानुसार बी.एड. विशेष शिक्षण अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे:
- सामान्य पात्रता:
- यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानव्यविद्या, सामाजिक शास्त्रे, विज्ञान किंवा वाणिज्य विद्याशाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किमान 50% गुणांसह (49.5% पेक्षा अधिक) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- उच्च व तंत्रशिक्षण विभाग शासन निर्णय क्र. समक 2007/(826/07) मशी-6 दि. 28/02/2007 प्रमाणे साहित्य सुधाकर ही पदवी प्रवेशासाठी पात्र धरण्यात येईल.
- इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असल्यास किमान 55% गुण अनिवार्य आहेत.
- राखीव प्रवर्गासाठी सवलत:
- राखीव प्रवर्गासाठी, वरील दोन्ही परिक्षेत्रात 5% गुणांची सवलत देण्यात येईल , म्हणजेच (44.49% पेक्षा अधिक) गुण आवश्यक आहेत.
- बाहेरच्या राज्यातील उमेदवारांसाठी:
- बाहेरच्या राज्यातील उमेदवारांचा प्रवेश खुल्या प्रवर्गातून करण्यात येईल. त्यांना कोणत्याही प्रकारच्या गुणांमध्ये सवलत दिली जाणार नाही.

YCMOU Bed Spl Admission 2025 ऑनलाईन अर्ज
महत्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत: 10 जुलै 2025 ते 24 जुलै 2025 पर्यंत (रात्री 11.59 वाजेपर्यंत)
अर्ज कसा करावा:
इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळाला भेट द्यावी. होमपेजवरील ‘Admission’ टॅबखाली ‘Prospectus (माहिती पुस्तिका) 2025-28’ येथे अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका, इतर माहिती आणि वेळापत्रक उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी नमूद केलेल्या कालावधीत अर्ज पूर्णपणे आणि अचूक भरून ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट : https://ycmou.digitaluniversity.ac/
YCMOU Bed Spl Portal : https://ycmousplbed.digitaluniversity.ac/CMS/Content_Static.aspx?did=456