School Rain Holiday Tomorrow: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या, सोमवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नेमकी सुट्टी कुठे? School Rain Holiday Tomorrow
हा सुट्टीचा आदेश जिल्ह्यासाठी आहे, मात्र महानगरपालिका क्षेत्रातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी नाही. महानगरपालिका क्षेत्र वगळता खालील सर्व शैक्षणिक संस्थांसाठी ही सुट्टी लागू असेल:
- अंगणवाड्या
- सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा
- जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा
- अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा
- सर्व आश्रमशाळा
- सर्व महाविद्यालये (कॉलेज)
- खाजगी शिकवणी (Classes)
‘यल्लो अलर्ट’ आणि पुराचा धोका हेच कारण
जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी हा निर्णय घेतला आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या इशाऱ्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने २८ सप्टेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी ‘यल्लो अलर्ट‘ जारी केला आहे.
- जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- सध्या जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण भरलेले आहेत.
- २८ सप्टेंबर २०२५ रोजी ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून प्रमुख नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे.
- जिल्ह्याच्या अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
तात्काळ सूचना देण्याचे आदेश
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व गटशिक्षणाधिकारी यांना तातडीने आपापल्या अखत्यारीतील शाळा व महाविद्यालयांना या सुट्टीबाबत सूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीमुळे School Rain Holiday Tomorrow (२९/०९/२०२५) जाहीर झाला आहे. महानगरपालिका क्षेत्र वगळता उर्वरित भागातील विद्यार्थी व पालकांनी या काळात घरी सुरक्षित राहावे, असे प्रशासनाने कळवले आहे.





