RTE Admission Maharashtra Start Date 2025 26 : सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया आता सुरु झाली असून, RTE च्या दुसऱ्या टप्प्यातील आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश नोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, व त्यानुसार संबंधित जिल्ह्यांना याबाबत कार्यवाही सुरु करणेबाबत परिपत्रकानव्ये कळविण्यात आले आहे.
Table of Contents
राज्यातील आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी 8 हजार 845 शाळांची नोंदणी पूर्ण
RTE Schools Registration : आरटीई २५ टक्के प्रवेश कोट्यातून खाजगी शाळांमध्ये प्रवेश मोफत घेण्यासाठी राज्य शासनातर्फे ही प्रक्रिया राबवली जाते. यावर्षी आरटीई ची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी डिसेंबर महिन्यातच शाळांची नोंदणी सुरू करण्यात आली होती.
RTE २५ टक्के प्रवेशप्रकीयेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील 8 हजार 845 शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, यामध्ये 1 लाख 8 हजार 793 पात्र मुलांना प्रवेश मिळणार आहे. (जिल्हानिहाय शाळा व RTE रिक्त जागा सविस्तर येथे पाहा)
आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित; या मानवी दिनांकावर ठरणार वयोमार्यादा
आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी या तारखेपर्यंत मुदत
RTE Admission Maharashtra Start Date 2025 26 : आरटीई २५ टक्के प्रवेश नोंदणीसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रीया ही दि. १४-०१-२०२५ ते दि. २७-०१-२०२५ या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
हे ही वाचा : आरटीई (RTE 25%) टक्के प्रवेश प्रक्रिया वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे
राज्यातील या शाळांमध्ये मिळणार आरटीई प्रवेश
सन २०२५-२६ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांसाठी RTE 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यामध्ये बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये इयत्ता १ ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर आरटीई २५ टक्के प्रवेश मिळणार आहे.
हे ही वाचा : RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे – ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती
RTE २५ टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज या अधिकृत वेबसाईटवर भरता येणार
RTE २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया ही दरवर्षी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. इयत्ता १ ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया (RTE Admission Maharashtra Start Date 2025 26) 14 जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आरटीई २५ टक्के प्रवेश अधिकृत वेबसाईट : https://student.maharashtra.gov.in/
आरटीई २५ टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज : डायरेक्ट लिंक