‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांसाठी आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) आणि e-KYC प्रक्रियेबाबत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक ११ डिसेंबर २०२५ रोजी जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, e-KYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
विशेष श्रेणीतील महिलांसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रक्रिया
ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत, किंवा पती देखील हयात नाहीत, अथवा ज्यांचा घटस्फोट झाला आहे, अशा महिलांसाठी पडताळणीची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे.
ऑफलाईन (Offline) प्रक्रिया: या महिलांनी स्वतःचे e-KYC पूर्ण केल्यानंतर, त्यांनी त्यांचे पती किंवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, किंवा घटस्फोट प्रमाणपत्र/मा. न्यायालयाचे आदेशाची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकेकडे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत जमा करायची आहे. सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करावयाची आहे.
ऑनलाईन (Online) प्रक्रिया: याबरोबरच, या लाभार्थी महिलांनी योजनेच्या अधिकृत वेब पोर्टलवर, https://ladakibahin.maharashtra.gov.in , भेट देऊन e-KYC प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम (पुर्ण) करणे बंधनकारक आहे. या संदर्भात पोर्टलवर आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
KYC Ladki Bahin Yojana Maharashtra: ‘वन टाइम एडिट’ची अंतिम संधी
ज्या पात्र महिला लाभार्थ्यांनी यापूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, मात्र पर्याय निवडताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या आहेत, अशा महिलांसाठी शासनाने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे.
अशा लाभार्थ्यांना पुनःश्च योजनेच्या वेब पोर्टलवर e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची एक अंतिम संधी (One Time Edit Option) उपलब्ध करून देण्यात येत आहे.
ही ‘वन टाइम एडिट’ची सुविधा देखील ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच उपलब्ध असणार आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, ही संधी शेवटची असणार आहे. या मुदतीनंतर माहितीमध्ये कोणताही बदल करण्याचा पर्याय उपलब्ध होणार नाही, त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी काळजीपूर्वक माहिती भरून ही KYC Ladki Bahin Yojana Maharashtra प्रक्रिया पूर्ण करावी.
क्षेत्रीय यंत्रणांना मार्गदर्शनाच्या सूचना
महिला व बाल विकास विभागाने त्यांच्या सर्व क्षेत्रीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत. या यंत्रणांनी पात्र लाभार्थी महिलांना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करावे.
आता विलंब न करता, सर्व पात्र महिलांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आपली KYC Ladki Bahin Yojana Maharashtra प्रक्रिया पूर्ण करावी आणि योजनेचा लाभ सुनिश्चित करावा.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय डाउनलोड करा
लाडकी बहीण योजना: e-KYC अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/
लाडकी बहीण योजना या लाभार्थी महिलांना e-KYC मधून सूट; शिफारस नमूना पत्र डाउनलोड करा



