राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांची प्रक्रिया आता वेग घेऊ लागली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती’ म्हणजेच Pre Matric Scholarship Scheme आणि गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळांनी महाडीबीटी (MahaDBT) प्रणालीवर आपली नोंदणी आणि माहिती तातडीने अद्ययावत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना | Pre Matric Scholarship Scheme
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (Social Justice and Special Assistance Department)
- इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती.
- इयत्ता ९ वी आणि १० वी साठी भारत सरकार शिष्यवृत्ती.
- अस्वच्छ आणि धोकादायक व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना.
- सैनिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता.
- माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क.
- माध्यमिक वर्गात (इयत्ता ५ वी ते १० वी) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व गुणवत्ता शिष्यवृत्ती.
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग (OBC, VJNT & SBC Welfare Department)
- इतर मागास वर्गातील (OBC) ५ वी ते ७ वीच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती.
- इतर मागास वर्गातील (OBC) ८ वी ते १० वीच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती.
- इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज (VJNT) आणि विमाप्र (SBC) विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती.
- माध्यमिक शाळांमध्ये (जिल्हा परिषद) शिकणाऱ्या विजाभज (VJNT) व विमाप्र (SBC) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती.
- माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विजाभज (VJNT) व विमाप्र (SBC) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती (फक्त मुंबई).
- इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज (VJNT) आणि विमाप्र (SBC) विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती.
- शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रदान (विजाभज किंवा विमाप्र).
- सैनिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता.
दिव्यांग कल्याण विभाग (Person With Disability Department)
- दिव्यांगांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मुंबई शहरचे सहायक संचालक रविकिरण पाटील यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे शाळांना सूचना दिल्या आहेत. शाळांनी वेळेत कार्यवाही केल्यास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे.
मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाच्या सूचना व लॉगिन प्रक्रिया या योजनांचा लाभ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी शाळांच्या मुख्याध्यापकांनी महाडीबीटी पोर्टलवर (https://prematric.mahait.org/) जाऊन शाळेची नोंदणी करणे अनिवार्य आहे.
Pre Matric Scholarship Scheme साठी नोंदणी करताना मुख्याध्यापकांनी खालील डिफॉल्ट लॉगिन क्रेडेंशियल्सचा वापर करावा:
- युजर आयडी (User ID): Pre_SE27XXXXXXXXX_Principal
- पासवर्ड (Password): Pass@123
लॉगिन केल्यानंतर मुख्याध्यापकांनी शाळेचे प्रोफाइल, मुख्याध्यापक व लिपिक यांची माहिती आणि त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. जी मुले ज्या विशिष्ट योजनेसाठी पात्र आहेत, त्यांच्यासाठी संबंधित शिष्यवृत्तीचा अर्ज प्रणालीवर नोंदवावा लागणार आहे.
विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नयेत प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विजाभज, इमाव आणि विमाप्र प्रवर्गातील एकही पात्र विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहू नये, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. यासाठी शाळा कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना योग्य ते मार्गदर्शन करून अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास मदत करावी.
Pre Matric Scholarship Scheme च्या अर्ज प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्यास किंवा काही शंका असल्यास, शाळांनी त्या लेखी स्वरूपात कळवाव्यात किंवा astdirmumcityvint@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असेही आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
शाळांनी आताच महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून आपली माहिती अपडेट करावी आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा.
अधिक माहितीसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या : https://prematric.mahait.org/




