नोंदणी व मुद्रांक विभागात ‘गट-ड’ संवर्गातील उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध

Published On: February 11, 2026
Follow Us
IGR Group D Result

IGR Group D Result: नोंदणी व मुद्रांक विभागात ‘गट-ड’ संवर्गातील उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई भरती निकाल जाहीर | IGR Group D Result

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात २८४ पदे भरतीकरिता आय. बी. पी. एस. कंपनीमार्फत जुलै-२०२५ मध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीच्या अनुषंगाने समुपदेशनाकरीता बोलाविण्यात येणार आहे.

याबाबत विभागाच्या https://igrmaharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर स्थळ व दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी कळविले आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गासाठीच्या परीक्षेचा निकाल दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता.

उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून सामाजिक व समांतर आरक्षणानुसार आणि गुणवत्तेनुसार उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे.

उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीअंती निवड यादी, प्रतिक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

arogya sevika bharti new gr

आरोग्य सेविका भरतीसाठी मोठा बदल; पात्रता गुणांची मर्यादा 45 वरून 35 टक्के – शासन निर्णय

August 13, 2026
shikshaketar-padbharti-GR

राज्यातील या शाळांमध्ये शिक्षकेतर पदभरतीला शासनाची मंजुरी; 80 टक्के पदे भरता येणार

August 12, 2026
Pavitra Portal Teacher Recruitment

पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ; 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

August 11, 2026
maharojgar melava 2026-27

राज्यात 1 हजार रोजगार मेळावे; युवकांना नोकरीसाठी दोन आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण मिळणार

August 5, 2026
talathi bharti notification 2026

तलाठी पदांच्या 1539 जागांसह MPSC गट क पदांची सुधारित जाहिरात प्रसिद्ध, डाउनलोड डायरेक्ट लिंक

August 3, 2026
public-exam-malpractice-bill-2026

लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2026 मंजूर; पेपरफुटी प्रकरणांत 10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

August 2, 2026

Leave a Comment