NMMS Admit Card Download 2025 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE Pune) यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. इयत्ता ८ वी मध्ये शिकणाऱ्या आणि या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. परिषदेने परीक्षेची तारीख आणि हॉल तिकीट (NMMS Admit Card) बाबत सविस्तर माहिती दिली आहे.
NMMS Exam Date 2025
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, २०२५-२६ या वर्षासाठीची इयत्ता ८ वी साठीची NMMS परीक्षा रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल २ लाख ५० हजार ५४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, एकूण १३,७८९ शाळांचा यात सहभाग आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ७५८ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
NMMS Admit Card Download 2025: प्रवेशपत्र कोठे आणि कसे मिळेल?
परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट (प्रवेशपत्र) १० डिसेंबर २०२५ पासूनच परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर शाळांच्या लॉगिनमध्ये (School Login) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी लक्षात घ्यावे की, हे प्रवेशपत्र थेट विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येणार नाही. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी www.mscepune.in किंवा https://mscenmms.in या संकेतस्थळाला भेट देऊन NMMS Admit Card Download 2025 प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि त्याची प्रिंट काढून ती विद्यार्थ्यांना वेळेत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शाळेची असणार आहे.
NMMS सराव प्रश्नपत्रिका PDF 2025 (सर्व माध्यम)
हॉल तिकीटमध्ये चूक असल्यास काय करावे?
बऱ्याचदा प्रवेशपत्रावर विद्यार्थ्याचे नाव किंवा इतर माहिती चुकीची छापून येते. अशा वेळी घाबरून न जाता परिषदेने दुरुस्तीसाठी एक खिडकी उपलब्ध करून दिली आहे.
दुरुस्ती कशात करता येईल?: विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यातील स्पेलिंगच्या चुका, तसेच जन्मतारीख, जात आणि आधारकार्ड माहिती. (टीप: पूर्ण नावात बदल करता येणार नाही, फक्त स्पेलिंग दुरुस्ती ग्राह्य धरली जाईल).
दुरुस्तीची मुदत: जर NMMS Admit Card Download 2025 केल्यानंतर तुम्हाला त्यात काही तफावत आढळली, तर २७ डिसेंबर २०२५ पर्यंत शाळेच्या लॉगिन मधूनच ऑनलाईन अर्ज करता येईल.
महत्त्वाचे: पालकांनी हे लक्षात घ्यावे की, दुरुस्तीसाठी टपाल, ईमेल किंवा समक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. फक्त ऑनलाईन अर्जच ग्राह्य धरले जातील. तसेच सदरच्या दुरुस्त्या या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येतील, त्यामुळे परीक्षेला बसण्यास काही अडचण येणार नाही.
विद्यार्थ्यांसाठी आवाहन परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतून आपले प्रवेशपत्र वेळेवर प्राप्त करून घ्यावे. प्रवेशपत्र मिळाल्यावर त्यावरील माहिती अचूक असल्याची खात्री करा.
NMMS Admit Card Download 2025 संदर्भात कोणतीही अडचण असल्यास तात्काळ आपल्या वर्गशिक्षकांशी किंवा मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, जेणेकरून २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेला सामोरे जाताना कोणतीही धावपळ होणार नाही.
राज्यभरातील या महत्त्वपूर्ण परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!





