महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) २०२६ मध्ये होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. आयोगाने “महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६” ची जाहिरात (क्रमांक १३२/२०२५) प्रसिद्ध केली आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होत असून, सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
MPSC Rajyaseva Notification 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) २०२६ या वर्षासाठीची महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ या नवीन जाहिरातीनुसार, सध्या विविध संवर्गातील एकूण ८७ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ही संयुक्त पूर्व परीक्षा रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेतली जाईल.
कोणत्या विभागासाठी किती जागा? या जाहिरातीमध्ये सामान्य प्रशासन विभाग आणि महसूल व वन विभाग यांच्या अंतर्गत येणाऱ्या पदांचा समावेश आहे.
- राज्य सेवा (सामान्य प्रशासन विभाग): ७९ पदे.
- महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा (महसूल व वन विभाग): ०८ पदे.
एकूण मिळून ८७ पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली असली, तरी विद्यार्थ्यांनी निराश होण्याचे कारण नाही. आयोगाने जाहिरातीत स्पष्ट केले आहे की, पूर्व परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी शासनाकडून अतिरिक्त मागणीपत्र आल्यास पदसंख्येत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सध्याची ८७ ही संख्या अंतिम नसून ती वाढू शकते.
पदांचा तपशील (संवर्गनिहाय)
या भरतीमध्ये खालील महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.
- उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी), गट-अ: १३ पदे.
- सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ: ३२ पदे.
- सहायक गट विकास अधिकारी, गट-ब: ३० पदे.
- उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब: ०४ पदे.
- पशुवैद्यकीय अधिकारी, गट-अ: ०८ पदे.


महत्त्वाच्या तारखा
या MPSC Rajyaseva Advertisement 2026 नुसार अर्ज भरण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख: ३१ डिसेंबर २०२५ (दुपारी २:०० वाजता).
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० जानेवारी २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत).
- परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख (ऑनलाईन): २० जानेवारी २०२६.
वयोमर्यादा आणि पात्रता
या परीक्षेसाठी वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा १ एप्रिल २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे (काही विशिष्ट तांत्रिक पदे वगळता). कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४३ वर्षे आहे.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ
- वाणिज्य शाखेची (Commerce) किमान ५५% गुणांसह पदवी, किंवा
- CA (Chartered Accountant) अंतिम परीक्षा उत्तीर्ण, किंवा
- ICWA (Cost & Works Accountants) अंतिम परीक्षा उत्तीर्ण, किंवा
- वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी (M.Com), किंवा
- अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन (MBA – Finance) या विषयातील पदव्युत्तर पदवी.
उद्योग अधिकारी, तांत्रिक, गट-ब
- अभियांत्रिकी मधील पदवी (Architecture/Town Planning सारखे विषय वगळून स्थापत्य अभियांत्रिकी व संलग्न विषय) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी, किंवा
- विज्ञान शाखेतील पदवी (Science Degree).
महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा (Maharashtra Veterinary Services)
पशुवैद्यकीय अधिकारी, गट-अ
- पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन (Veterinary Science and Animal Husbandry) विषयातील पदवी.
- महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, १९७१ अन्वये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
इतर महत्त्वाच्या अटी (Other Important Conditions)
- मराठी भाषेचे ज्ञान: सर्व पदांसाठी उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- अंतिम वर्षाचे विद्यार्थी: पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेसाठी पात्र असतील. परंतु, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरल्यास, मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
- आंतर्वासिता (Internship): ज्या पदवीसाठी इंटर्नशिप आवश्यक आहे, अशा उमेदवारांनी मुख्य परीक्षेचा अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेपर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी.
परीक्षा शुल्क
- अमागास (Open Category): ५४४ रुपये.
- मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग: ३४४ रुपये.
ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी आयोगाच्या https://mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. शेवटच्या दिवशी सर्व्हरवर ताण येऊ शकतो, त्यामुळे ३१ डिसेंबरला लिंक सुरू होताच लवकरात लवकर अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अर्ज कसा करावा? (How to Apply)
- उमेदवारांनी mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
- जर प्रोफाईल नसेल तर नवीन नोंदणी करावी.
- लॉगिन करून ‘MPSC Civil Services Gazetted Exam 2026’ निवडून अर्ज भरावा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि परीक्षा शुल्क भरावे.
टीप: अधिकृत जाहिरात आणि सविस्तर माहितीसाठी MPSC च्या अधिकृत वेबसाईटला (mpsc.gov.in) भेट द्यावी.
तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल तरीही तुम्ही या पूर्व परीक्षेसाठी पात्र आहात, मात्र मुख्य परीक्षेचा फॉर्म भरेपर्यंत तुमची पदवी पूर्ण होणे आवश्यक आहे. अभ्यासाला वेगाने सुरुवात करा, कारण ३१ मे २०२६ ला परीक्षा होणार आहे.
अधिक माहितीसाठी : MPSC Rajyaseva Notification 2026 PDF Download Click Here
अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/adv_notification/8#

















