Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ताजी अपडेट आहे. e-KYC करताना येणाऱ्या अडचणींवर शासनाने 31 डिसेंबर ही शेवटची मुदत दिली आहे.
मात्र त्याच बरोबर ज्यांचे e-KYC झाले आहे मात्र चूक झाली आहे. आणि ज्यांचे e-KYC होत नाही अशा सर्व समस्या लक्षात घेवून अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर पर्यंत आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे सूचित केले आहे. तेव्हा याविषयीची नेमकी प्रक्रिया काय आहे? सविस्तर जाणून घेऊया.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण सुरू
महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण सुरू करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी आता सर्व पात्र लाभार्थी महिलांचे ekyc होणे आवश्यक आहे. यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे.
लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांना e-KYC करताना अडचणी येत होत्या. विशेषतः ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत, त्यांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईलवर OTP मिळणे शक्य नव्हते. त्यांना e-KYC करताना येणाऱ्या अडचणींवर शासनाने तोडगा काढला आहे.
आता अशा महिलांना अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) यांच्याकडे कागदपत्रे जमा करून एक ‘शिफारस पत्र‘ (Recommendation Letter) मिळवता येणार आहे.
शासनाच्या नवीन आदेशानुसार, खालील महिलांना या प्रक्रियेतून दिलासा मिळाला आहे:
- ज्या महिलांच्या वडिलांचे निधन झाले आहे.
- ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहे.
- ज्या महिलांचा घटस्फोट (Divorce) झालेला आहे.
अशा महिलांना आता त्यांच्या पती किंवा वडिलांच्या e-KYC Authentication मधून सूट मिळणार आहे, पण त्यासाठी एक महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
अंगणवाडी सेविकांकडे काय जमा करायचे?
तुम्ही जर वरील निकषांत बसत असाल, तर तुम्हाला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधायचा आहे.
स्वतःचे e-KYC पूर्ण करा: सर्वात आधी लाभार्थी महिलेने स्वतःचे e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
कागदपत्रे जमा करा: त्यानंतर पती किंवा वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र (Death Certificate), किंवा घटस्फोट झाला असल्यास घटस्फोट प्रमाणपत्र/कोर्टाचा आदेश याची सत्यप्रत अंगणवाडी सेविकेकडे जमा करावी.
शिफारस पत्र (Recommendation Letter): तुम्ही जमा केलेल्या कागदपत्रांची पडताळणी अंगणवाडी सेविका करतील. त्यानंतर, त्या तुमच्या वतीने एक ‘शिफारस पत्र’ भरून देतील.

या पत्रात “संबंधित लाभार्थी महिलेच्या पती/वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना e-KYC पासून सूट देण्यात यावी,” अशी शिफारस असेल.
हे शिफारस पत्र शासनाच्या पुढील प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
Online Process आणि ‘One Time Edit Option’
ऑफलाईन कागदपत्रे जमा करण्यासोबतच, ऑनलाईन पोर्टलवरही काही गोष्टी करणे गरजेचे आहे.
महिलांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत Web Portal वर जाऊन आपली e-KYC प्रक्रिया ‘Final’ करणे आवश्यक आहे.
जर e-KYC करताना किंवा फॉर्म भरताना काही चूक झाली असेल, तर ती सुधारण्यासाठी One Time Edit Option देण्यात आला आहे. ही संधी देखील फक्त ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच उपलब्ध आहे. त्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट केले आहे की, ३१ डिसेंबर नंतर मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता, ज्या महिलांना पती किंवा वडिलांच्या e-KYC मुळे अडचण येत आहे, त्यांनी तातडीने आपली कागदपत्रे अंगणवाडी ताईंकडे जमा करावीत.
लाडकी बहीण योजना eKYC सूट नमूना शिफारस पत्र पीडीएफ येथे डाउनलोड करा


















