महिलांसाठी खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता कधी जमा होणार? त्वरित चेक करा! Ladki Bahin Yojana New Update

By Marathi Alert

Updated on:

Ladki Bahin Yojana New Update: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, “आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक सक्षमीकरणाकडे महिलांचा प्रवास सुरू आहे आणि ‘झेप फाउंडेशन’ या प्रवासात मोलाची मदत करत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून (Ladki Bahin Yojana) मिळणाऱ्या निधीतून महिला बचत गटांमार्फत उद्योजकतेकडे वळत आहेत.लाडक्या बहिणी‘ आता ‘लाडक्या उद्योजिका’ बनत आहेत.”

‘विकसित भारत महिला उद्योजिका २०२५’ संमेलन:

वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ‘झेप फाउंडेशन’ने ‘विकसित भारत महिला उद्योजिका २०२५’ या संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी आणि महिला बचत गटांमार्फत उद्योग करणाऱ्या महिलांचा आदिती तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (Ladki Bahin Yojana New Update)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक फरोग मुकादम, उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर, नगरसेविका हर्षिता नार्वेकर, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यकारी संचालक रूपा नाईक, ‘झेप’च्या संचालिका पौर्णिमा शिरीषकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट, अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी बातमी

लाडकी बहीण योजने’च्या २ कोटींपेक्षा जास्त महिला लाभार्थी Ladki Bahin Yojana New Update

आदिती तटकरे म्हणाल्या, “जागतिक महिला दिन” हा स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा दिवस आहे. ‘झेप फाउंडेशन’ने या निमित्ताने ५०० हून अधिक बचत गटांतील महिलांना एकत्र आणले आहे. ‘लाडकी बहीण योजने’च्या २ कोटींपेक्षा जास्त महिला लाभार्थी आहेत. या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात मोठी मदत होत आहे.”

लाडकी बहीण योजनेत वाढीव रक्कम जाहीर होणार का? महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे!

लघु उद्योगांमध्ये ७० टक्के महिला कार्यरत

प्रधान सचिव अश्विनी भिडे म्हणाल्या, “महिलांमध्ये जिद्द आणि महत्त्वाकांक्षा असेल, तर त्या आपले ध्येय नक्कीच गाठू शकतात. लघु उद्योगांमध्ये ७० टक्के महिला कार्यरत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमार्फत ग्रामीण भागातील महिलांनाही उद्योजक बनवता येऊ शकते.”

लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट – खात्यात ३००० रुपये जमा!

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकार आणि संस्था एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळत आहे.

महिलांसाठी मोठी संधी! लाडकी बहीण योजनेच्या लाभातून मिळाले 30 लाख रुपये, यांनी केले तुम्हीही करू शकता 

लाडकी बहीण योजना: पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना अपात्र

लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास ९ लाख महिलांचे अर्ज विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत. या योजनेसाठी शासनाने निश्चित केलेले पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
अर्ज रद्द होण्याची प्रमुख कारणे:

  • पात्रता निकषांची पूर्तता न करणे: योजनेसाठी आवश्यक असलेले निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
  • आर्थिक मर्यादा: काही महिलांची वार्षिक उत्पन्न मर्यादा जास्त असल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
  • इतर योजनांचा लाभ: काही महिलांना आधीच इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत असल्याने त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
  • घरी चार चाकी वाहन असणे: ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • सरकारी नोकरीत असणाऱ्या महिला: सरकारी नोकरीत असणाऱ्या महिलांना वगळण्यात येईल.
  • दिव्यांग योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला: दिव्यांग योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र ठरवलं जाईल.
  • लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्यांनाही वगळण्यात येणार आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची मोठी भरती! संपूर्ण माहिती

लाडकी बहीण योजनेचे नवीन पात्रता निकष

  • लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत E-KYC करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे.
  • दरवर्षी १ जून ते १ जुलै दरम्यान ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे.
  • अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल.

Ladki Bahin Yojana February Installment Date Maharashtra

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे की, 8 मार्च, जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. (Ladki Bahin Yojana February Installment Date 2025)

महिला दिनाचे औचित्य साधून, 5 ते 6 मार्चपर्यंत निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होईल आणि 8 मार्च रोजी सर्व महिलांना त्यांच्या खात्यात थेट पैसे मिळतील.

  • तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: https://ladakibahin.maharashtra.gov.in/
  • तुम्ही तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या कार्यालयातही संपर्क साधू शकता.

तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेत का हे तपासा

महिलांसाठी खुशखबर! ‘माविम’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षात होणार मोठे बदल!

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महामंडळाच्या कामाचा विस्तार करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

काय आहेत महत्वाचे निर्णय?

  • जन सुविधा केंद्रांची जबाबदारी बचतगटांकडे: महामार्गावरील जन सुविधा केंद्रांची देखभाल आता महिला बचतगट करणार! या केंद्रांवर महिलांसाठी प्रदर्शन, हस्तकला विक्री केंद्र आणि अल्पोपहार स्टॉल्स असतील.
  • सर्व्हिस सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी: सर्व्हिस सेक्टरमध्ये महिलांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
  • शहरी महिलांसाठी विशेष योजना: शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नवीन योजना लवकरच सुरू होणार.
  • पंडिता रमाबाई योजना: ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी ‘पंडिता रमाबाई वैयक्तिक महिला अर्थार्जन योजना’ प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश.

अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची मोठी भरती! संपूर्ण माहिती

जागतिक महिला दिन विशेष: महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या दिलखुलास मुलाखती

International Women’s Day : जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात होणार आहे. महिला सक्षमीकरण आणि शासकीय योजनांविषयी जाणून घ्या.

महिला दिनाचे महत्त्व

समाजाच्या विकासात महिलांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. महिलांना समान हक्क मिळणे तसेच त्यांच्या अधिकारांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी ‘जागतिक महिला दिवस’ (International Women’s Day) जगभरात साजरा केला जातो.

महत्वाचे मुद्दे

  • ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रम:
    • प्रसारण: ४ मार्च २०२५, रात्री ८:०० वा.
    • चॅनल: दूरदर्शन सह्याद्री वाहिनी.
  • ‘दिलखुलास’ कार्यक्रम:
    • प्रसारण: ६, ७, ८ मार्च २०२५, सकाळी ७:२५ ते ७:४० वा.
    • चॅनल: आकाशवाणी सर्व केंद्रे आणि ‘न्यूज ऑन एआयआर’ ॲप.
  • मुलाखतकार: डॉ. मृण्मयी भजक.

विषय:

  • महिला सक्षमीकरण आणि हक्क.
  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ आणि इतर शासकीय योजना.
  • महिला आणि मुलांच्या विकासासाठी शासनाचे प्रयत्न.

कुठे पाहता येईल:

सारांश

Ladki Bahin Yojana New Update: महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ‘झेप फाउंडेशन’ च्या सहकार्याने महिला उद्योजकतेला चालना दिली आहे. ‘विकसित भारत महिला उद्योजिका २०२५’ संमेलनात ५०० हून अधिक महिला सन्मानित झाल्या. ‘माविम’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महिलांसाठी जनसुविधा केंद्रे, रोजगाराच्या संधी, आणि ‘पंडिता रमाबाई अर्थार्जन योजना’ सारख्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महिला सक्षमीकरणावरील चर्चा होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!