Maharashtra School Holidays 2025 राज्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अखेर महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी (School Summer Holidays) जाहीर केली आहे, व सोबतच नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा सुरु करण्याबाबत कळविले आहे. कधी लागणार उन्हाळी सुट्टी (School Holidays 2025) आणि केंव्हा सुरु होणार पुन्हा शाळा? वाचा या लेखामध्ये संपूर्ण माहिती
Maharashtra School Holidays 2025
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुटटी (School Summer Holidays) व शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु करणेबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय कार्यालयाने दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी निर्गमित केले आहे.
या परिपत्रकान्वये शासनाने, संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
राज्यातील शाळांना शुक्रवार पासून उन्हाळी सुट्टी School Summer Holidays
राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु करणेबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
- राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार, दि. 2 मे, 2025 पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
- राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्याना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा या तारखेपासून सुरू होणार
पुढील शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि. 16 जून, 2025 रोजी सुरु करण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, दि. 23 जून, 2025 ते 28 जून 2025 पर्यंत सकाळ सत्रात 7.00 ते 11.45 या वेळेत सुरु करण्यात
येणार आहे. सोमवार दि.30.06.2025 पासून नियमित वेळेत शाळा सुरु करण्याबाबत कळविले आहे.
त्यामुळे आता राज्यातील शाळांना 2 मे पासून सुट्टी लागणार असून, नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा 16 जून पासून पुन्हा सुरू होणार आहे. यंदा एकूण 45 दिवसांची उन्हाळी सुट्टी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी: परिपत्रक येथे डाउनलोड करा
