MHT CET PCM PCB Group Result Link 2025 एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर

Published On: June 17, 2025
Follow Us
MHT CET PCM PCB Group Result Link 2025

MHT CET PCM PCB Group Result Link 2025 : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (cetcell) कक्षामार्फत घेण्यात आलेल्या MHT CET Exam 2025 परीक्षेचा निकाल cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर PCM Group चा निकाल 16 जून तर PCB Group चा निकाल 17 जून रोजी जाहीर करण्यात आला आहे. निकाल पाहण्यासाठी Official Website खाली दिलेली असून, तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता.

MHT-CET 2025 PCM ग्रुपचा निकाल जाहीर; 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल

महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (State Common Entrance Test Cell) MHT-CET 2025 (PCM ग्रुप) परीक्षेचा निकाल आज, १६ जून २०२५ रोजी जाहीर केला आहे. हा निकाल www.mahacet.org आणि www.mahacet.in या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

यावर्षी MHT-CET 2025 (PCM ग्रुप) परीक्षा १९ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत, तर ५ मे २०२५ रोजी अतिरिक्त परीक्षा घेण्यात आली होती. महाराष्ट्रातील २०७ आणि राज्याबाहेरील १७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. एकूण ४,६४,२६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ४,२२,६६३ (९१.०४%) विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले.

PCM ग्रुपमधील २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल या परीक्षेत PCM ग्रुपमधून एकूण २२ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवून विशेष प्रावीण्य संपादन केले आहे.

MHT CET PCM PCB Group Result Link 2025

महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (State Common Entrance Test Cell) शैक्षणिक वर्ष २०२४-२६ साठी घेण्यात आलेल्या MHT-CET 2025 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. अभियांत्रिीक, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेचे PCM आणि PCB या दोन्ही गटांचे निकाल प्रसिद्ध झाले आहेत.

निकाल कुठे पाहाल?

परीक्षार्थी आपला निकाल www.mahacet.org आणि www.mahacet.in या संकेतस्थळांवर लॉग इन करून पाहू शकतात. त्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

Step 1: सर्वप्रथम MHT CET Result 2025 Maharashtra Official Websitehttps://cetcell.mahacet.org/ या अधिकृत वेबसाईटवर जा.

Step 2: आता MHT-CET 2025 Results
PCM Group – June 16, 2025
Access your results यावर क्लिक करा.

MHT-CET 2025 Results
PCB Group – June 17, 2025
Access your results यावर क्लिक करा.

Step 3: लिंक ओपन झाल्यावर Login मध्ये Registered Email ID आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

Step 4: आता तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Step 5: निकाल डाउनलोड करा.

अधिकृत वेबसाईट : https://cetcell.mahacet.org/

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment