राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द Employees Leave Latest Circular

By MarathiAlert Team

Updated on:

Employees Leave Latest Circular मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिनांक 9 मे रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन सध्याची आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता मोठा आदेश दिला आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द Employees Leave Latest Circular

Employees Leave Latest Circular राज्यात आणि देशात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे ज्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना यापूर्वी रजा मंजूर झाल्या आहेत, त्या सर्व रजा तात्काळ रद्द करण्यात येत आहेत. तसेच पुढील आदेश येईपर्यंत कोणालाही रजा मंजूर करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

कार्यालय प्रमुखांना तातडीचे आदेश

सर्व कार्यालय प्रमुखांना निर्देश देण्यात आले आहेत की:

  • त्यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या रजा तात्काळ रद्द करण्याचे आदेश द्यावेत.
  • ही माहिती प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवावी.
  • कोणताही कर्मचारी मुख्यालयाच्या बाहेर असू नये.

9 मेपूर्वी मंजूर रजा देखील रद्द

या बैठकीत हेही स्पष्ट करण्यात आले की 9 मे 2025 पूर्वी मंजूर झालेल्या सर्व रजा रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे अशा सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपल्या कार्यस्थळी हजर व्हावे, अशी सूचना देण्यात आली आहे.

जर कोणताही कर्मचारी सुट्टीवर असून देखील मुख्यालयात अनुपस्थित आढळला, तर त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिकृत माहितीसाठी शासन परिपत्रक येथे पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!