Ganeshotsav Employees August Salary यंदाचा गणेशोत्सव लवकर सुरु होत असल्याने, महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना गणेशोत्सवासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये, म्हणून वित्त विभागाने ऑगस्ट महिन्याचा पगार लवकर देण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
Ganeshotsav Employees August Salary
कधी मिळणार पगार?
सहसा १ सप्टेंबरला मिळणारा ऑगस्ट महिन्याचा पगार, आता २६ ऑगस्ट, २०२५ रोजीच मिळेल. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने यासंदर्भात एक शासन निर्णय जारी केला आहे.
कोणाकोणाला होणार फायदा?
हा निर्णय फक्त राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठीच नाही, तर निवृत्तीवेतनधारक (पेन्शनर्स) आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही लागू होईल. याशिवाय, जिल्हा परिषद, अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी आणि बिगर-कृषी विद्यापीठांमधील अधिकारी, कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळेल.
यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्ट, २०२५ पासून सुरू होत आहे. त्यामुळे, राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सण साजरा करताना कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी ऑगस्ट महिन्याचा पगार लवकर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा पगार वेळेवर जमा व्हावा यासाठी सर्व संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे, सर्व कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव अधिक आनंदात साजरा होईल.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय वाचा