Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ‘19’ मोठे निर्णय!

Published On: August 25, 2024
Follow Us
Cabinet Decisions

Cabinet Decisions : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 25 ऑगस्ट रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

  1. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. मार्च २०२४ पासून अंमलबावणी. लाखो कर्मचाऱ्यांना फायदा (सविस्तर येथे वाचा)
  2. राज्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली
  3. गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ
  4. ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार
  5. थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी
  6. पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार. पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार
  7. नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प. ७ हजार १५ कोटीस मान्यता. नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा
  8. सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी
  9. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत
  10. ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ. सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ
  11. ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी #महाप्रित ५ हजार कोटी निधी उभारणार
  12. ‘बार्टी’ च्या ‘त्या’ ७६३ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ
  13. मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार. विविध महामंडळे प्रकल्प राबविणार
  14. कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ
  15. कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ
  16. चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल
  17. श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना
  18. पाचोऱ्यातील सहकारी सूत गिरणीस शासन अर्थसहाय्य
  19. सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment