Lad Page Committee Recommendation महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने एका महत्त्वपूर्ण आदेशाद्वारे कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई येथील ‘सफाईगार’ संवर्गातील एक पद पुन्हा सेवेत (पुनर्जीवित) आणण्यास मान्यता दिली आहे. हा निर्णय लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार वारसा हक्काने नियुक्ती मिळण्यास पात्र असलेल्या उमेदवारांसाठी मोठा दिलासा देणारा आहे.
काय आहे नेमका निर्णय? Lad Page Committee Recommendation
- पुनरुज्जीवन झालेले पद: कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई येथील गट-ड संवर्गातील ‘सफाईगार‘ हे पद पुनर्जीवित करण्यात आले आहे.
- पदाची संख्या: सध्या प्रतीक्षेत असलेल्या वारस उमेदवारांची संख्या विचारात घेऊन, एक (०१) पद पुनर्जीवित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
- कार्यालयाची स्थिती: कामगार आयुक्तालय, मुंबई येथे ‘सफाईगार’ संवर्गात एकूण ०५ मंजूर पदे आहेत. वारसा हक्काने नियुक्तीसाठी प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची संख्या ०१ आहे.
निर्णयाची पार्श्वभूमी
यापूर्वी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने ०६ डिसेंबर, २०२१ रोजी कामगार आयुक्त कार्यालयातील आस्थापनेवरील सुधारित आकृतीबंध मंजूर केला होता, ज्यात गट-ड मधील ‘सफाईगार’ हे पद ‘मृत संवर्ग’ म्हणून घोषित करण्यात आले होते.
तथापि, सामाजिक न्याय विभाग आणि वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या शासन निर्णयानुसार:
- लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार, सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्कानुसार नियुक्त्या देण्यासाठी गट-क आणि गट-ड मधील आवश्यक तेवढी नियमित पदे राखीव ठेवण्याचे अधिकार प्रशासकीय विभागांना दिलेले आहेत.
- या अनुषंगाने, कामगार आयुक्तांनी मृत संवर्गातील ‘सफाईगार’ हे पद पुनर्जीवित करण्याची विनंती शासनाकडे केली होती.
शासनाने या विनंतीचा विचार करून, लाड-पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
नियुक्तीसाठी लागू असणाऱ्या तरतुदी
या पुनर्जीवित केलेल्या पदावर होणाऱ्या नियुक्त्यांसाठी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वारसा हक्काच्या अंमलबजावणीबाबतचे शासन निर्णय (दि. २४.०२.२०२३ आणि दि. १३.१०.२०२४) लागू राहतील.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय वाचा




